Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शिरोळमध्ये जादा पावसाचा मूग, उडीद उत्पादकांना फटका

Team Agrowon

Kolhapur News : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने मूग, उडीद पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले. ऐन फुलकळीच्या काळातच शेतात फूटभर पाणी साचून राहिल्याने पिके हातची गेली आहेत. जादा पाण्यामुळे फुलकळीनंतरची प्रक्रियाच थांबल्याने मूग, उडीद पीक वायबगेल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा फटका बसला आहे.

शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांकडून मूग आणि उडीद पिकाची लागवड केली जाते. मुगाला चांगला भाव असल्याने बहुतांश शेतकरी आंतरपीक म्हणूनदेखील मूग आणि उडदाची लागवड करतात. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात पिके पाण्यात राहिली. नंतर आठ-दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पावसाने झोडपायला सुरुवात केल्यानंतर मग, उडीद पीक पुन्हा एकदा पाण्यात उभे आहे.

शेतात फूटभर पाणी असल्याने मूग, उडीद पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फक्त मूग आणि उडदाची शेती पिकवली होती. सुरुवातीच्या काळात पीक चांगले आले. मात्र फुलकळीच्या काळात पावसाने झोडपायला सुरुवात केल्यानंतर पिकांची वाढ झाली असली तरी फुलकळी नंतरची प्रक्रिया मात्र पूर्णपणे थांबली. सध्या झाडांचे केवळ सांगडेच शेतात पाहायला मिळत आहेत. पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे पीक शेतातून काढून टाकणेदेखील कठीण बनले आहे.

मशागत, बी-बियाणे, औषधे, मजुरी आदींचा खर्च करून उत्पन्नातून चार पैसे पदरी पडतील या भावनेत असणारा शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. अजूनही शेतांमध्ये पाण्याचे पाझर येत आहेत. जादा पाऊस आणि जादा पाण्यामुळे पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

भुईमूग पिकालाही फटका

मूग, उडीद पिकाबरोबरच सखल शेतीतील भुईमूग पिकाला देखील जादा पाण्याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भुईमुगाचे हिरवेगार वेल फूट-दीड फुटाने वाढ होऊनही जमिनीत शेंग नसल्याचे प्रकार पुढे येत आहेत.

साडेतीन एकर उडीद, एक एकर मूग शेती केली होती. मात्र पाऊस आणि जास्त काळ शेतात पाणी साचून राहिल्याने मूग, उडीद पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. साडेतीन एकर क्षेत्रासाठी जवळपास दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र पाऊस आणि जादा पाण्याने पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी.
प्रकाश मादनाईक, मूग, उडीद उत्पादक शेतकरी, जयसिंगपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT