Crop Damage
Crop DamageAgrowon

Urad Crop Damage : अतिपावसाचा उडीद पिकाला फटका

Heavy Rain : जळगाव जिल्ह्यात उडदाची पेरणी यंदा घटली आहे. यातच पीक अतिपावसाने खराब झाले आहे. त्याची वाढ खुंटली असून, पीक पिवळे पडत आहे.
Published on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात उडदाची पेरणी यंदा घटली आहे. यातच पीक अतिपावसाने खराब झाले आहे. त्याची वाढ खुंटली असून, पीक पिवळे पडत आहे. पिकाची अनावश्यक वाढही काही भागात झाली असून, त्यास शेंगाही लागलेल्या नाहीत.

उडदाची पेरणी मागील हंगामात जूनमध्ये पावसाचा खंड असल्याने घटली होती. तसेच दुष्काळी स्थितीने अनेक शेतकऱ्यांचे उडीद पीक हातचे गेले होते. मागील वेळेस जून व ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड होता. यात पिकास फटका बसला होता. यंदा पाऊस वेळेत व हवा तसा आला. पेरण्यांना वेळेत सुरुवात झाली. उडदाची पेरणीही वेळेत झाली. त्यावर पाऊस आल्याने उगवणही जोमात होती. परंतु जुलै व ऑगसच्या सुरुवातीला अतिपाऊस झाला. यामुळे उडीद पिकाला फटका बसला.

Crop Damage
Crop Damage Compensation : बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम

सततच्या पावसाने हलक्या जमिनीत पिकाची अनावश्यक वाढ झाली आहे. त्यास शेंगा, फुले लगडलेली नसल्याने उत्पादनाला मोठा फटका बसल्याची स्थिती आहे. तर अनेक शेतांत पीक पिवळे पडले असून, त्यावर नांगर फिरवावा लागत आहे. जिल्ह्यात उडदाची पेरणी जळगाव तालुक्यात अधिक आहे. या पाठोपाठ चोपडा, यावल, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागांत उडीद पीक आहे.

जिल्ह्यात उडदाची पेरणी सुमारे १८ ते १९ हजार हेक्टरवर केली जाते. परंतु यंदा सुमारे १६ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. पेरणी घटली, त्यात अतिपावसाने पिकाची हानी झाल्याने उडदाचे उत्पादन ४० ते ४५ टक्के कमी होईल, अशीही स्थिती आहे. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द, विदगाव, भादली बुद्रुक, आसोदा, ममुराबाद, तुरखेडा, आव्हाणे, कानळदा, कडगाव, शेळगाव, भोलाणे आदी सर्वच भागांत उडीद पिकाची अतिपावसाने हानी झाली असून, पीक पिवळे पडून नुकसान होत आहे.

Crop Damage
Heavy Rain Damage : अतिवृष्टीने भोरमध्ये ८०, तर मुळशीत ६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान
उडीद पिकाची अतिपावसात मोठी हानी झाली आहे. आमच्या भागात पिकास शेंगा न लागणे, पीक पिवळे पडणे व अन्य समस्या दिसत आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जावी, अशी मागणी आहे.
चंद्रकांत पाटील, शेतकरी, खेडी खुर्द (ता.जळगाव)

पंचनामे करा

उडीद पिकाचे अतिपाऊस व अन्य समस्यांमुळे नुकसान होत आहे. पिकास फुपनगरी, कानळदा भागात शेंगा लागलेल्या नाहीत. खेडी खुर्द, आसोदा, ममुराबाद, विदगाव व अन्य भागात पीक पिवळे पडले आहे. यामुळे पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे आठ ते १० हजार हेक्टरवरील उडीद पिकाची अतोनात हानी झाल्याचा अंदाज आहे.

पीक उपटून पुरण्याची कार्यवाही

अनेक शेतकरी पीक पिवळे पडल्याने त्याच्या अवशेषांमुळे जमिनीत रोगराई किंवा अन्य समस्या तयार होऊ नयेत यासाठी उडदाचे पीक काढून ते खड्ड्यात पुरत आहेत. जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द व लगत अशी कार्यवाही शेतकरी करीत आहेत. खेडी खुर्द येथील शेतकरी कैलास छगन चौधरी यांनी पीक उपटून ते ख़ड्ड्यात पुरल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com