Nashik News Agrowon
ॲग्रो विशेष

Godavari River Pollution : ‘जलपर्णी’मुक्त गोदावरीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

River Pollution Update : दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते.

Team Agrowon

Godavari River Pollution Nashik News : ‘‘दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. शहराच्या व कारखान्याच्या सांडपाण्यातील दूषित घटक मिसळले की जलपर्णी वाढते.

दूषित घटक पाण्यात मिसळणे बंद होत नाही, तोपर्यंत जलपर्णीची वाढ होतच राहील. जलपर्णीमुळे नदीची नैसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,’’ अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. १०) घेण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (करमणूक शुल्क) राणी ताटे, उपायुक्त मनपा अर्चना तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्‍वर इगवे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित आदी उपस्थित होते.

गमे म्हणाले, ‘‘रामकुंडावरील क्राँक्रिटीकरण थांबविले आहे. महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी संयुक्त बैठक घेऊन यावर उपाययोजना सुचवाव्यात. कुठलेही सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे.’’

प्रदूषण टाळून उद्योग चालविणाऱ्या श्‍यामला इलेक्ट्रा प्लाटर्स व एबीबी या औद्योगिक संस्था, पर्यावरण व वीज बचतीचा संदेश देणारे महावितरणचे कर्मचारी योगेश बर्वे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

Agriculture Policy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांवर अनुदान मंजुरीवरून आरोप; भाजपने आरोप फेटाळले

Crop Insurance Data Discrepancy: पीकविमा नफ्याच्या आकडेवारीत विसंगती

Russia Fuel Shortage: युक्रेन युद्धामुळे रशियात इंधनटंचाई

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT