Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : प्रत्येकाने ‘श्रीअन्नाचे’ ब्रॅण्ड ॲम्बेसिडर व्हावे : मोदी

Shri Ann Project : ‘‘सरकारने आरोग्यवर्धक तृणधान्यांना ‘श्रीअन्न’ म्हणून नवी ओळख दिली आहे. आता प्रत्येकाला या ‘श्रीअन्नाचे’ ब्रॅण्ड ॲम्बेसिडर व्हायचे आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘सरकारने आरोग्यवर्धक तृणधान्यांना ‘श्रीअन्न’ म्हणून नवी ओळख दिली आहे. आता प्रत्येकाला या ‘श्रीअन्नाचे’ ब्रॅण्ड ॲम्बेसिडर व्हायचे आहे. त्यांच्या आहारातील सेवनातून आपले आरोग्य ही चांगले राहील आणि देशातील छोट्या शेतकऱ्यांचेही कल्याण होईल,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उ‌द्‌घाटन शुक्रवारी (ता.१२) श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, डॉ. भारती पवार, निशित प्रामाणिक, मंत्री संजय बनसोडे, राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

श्री. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी प्रत्येकाच्या घरात बाजरीची भाकरी, कोदो, कुडकी, रागी, ज्वारी आवर्जून असायची. मात्र गुलामीच्या मानसिकतेने या आरोग्यवर्धक अन्नाला गरिबीशी जोडले गेले. त्यामुळे हे अन्न स्वयंपाक घरातून हद्दपार केले गेले.

आज हेच अन्न मिलेट, सुपरफूड या रूपाने पुन्हा स्वयंपाकघरात येऊ लागले आहे. जलवायू बदलाचे आव्हान ओळखून येणाऱ्या काळात प्राकृतिक शेतीला चालना द्यावी लागेल.’’ दरम्यान येथील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पंतप्रधानांचा ‘रोड शो’ झाला. त्यांनतर त्यांनी गंगा आरती, ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेतले.

‘अनेकांची नीती केवळ तिजोऱ्या भरण्याची’

मुंबई : ‘भारतीयांच्या कराचा पैसा देशातील विकासकामांसाठी वापरला जात आहे. आमची नियत साफ आहे, देशाप्रती निष्ठा आहे. त्यामुळे मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. या आधी घोटाळ्यांची चर्चा व्हायची, आता मात्र विकासकामांची चर्चा होतेय.

ज्यांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले त्यांच्या नियत आणि नीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अनेकांची नीती केवळ सत्तेसाठी आणि स्वत:च्या तिजोऱ्या भरण्याची आहे,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत झालेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात केली.

श्री. मोदी यांच्या हस्ते या वेळी २१. ८ किलोमीटर लांबीचा शिवडी ते न्हावा-शेवा हा अटल सेतू, ईस्टर्न फ्री वे ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हला जोडणाऱ्या बोगद्याची पायाभरणी, सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा, ऐरोली येथील दिघा गाव रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगाव स्थानकादरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गिकेचे उद्‌घाटन झाले. ‘लेक लाडकी’ योजनेचे लोकार्पणही करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT