Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Use : रासायनिक खतविरोधी प्रचारानंतरही वाढला वापर

Fertilizer Market : संतुलित खत वापर व जमीन सुपीकतेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती येत आहे. त्यामुळेच रासायनिक खतांच्या विरोधात सरकारी सूर असूनही वापर वाढत असल्याचे खत उद्योगाला वाटते.

मनोज कापडे

Pune News : केंद्र सरकारच्या पातळीवर गेल्या दोन वर्षांत रासायनिक खतांच्या विरोधात सूर लावला गेला; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांचा वापर वाढला आहे, अशी माहिती खत उद्योगातील सूत्रांनी दिली.

संतुलित खत वापर व जमीन सुपीकतेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती येत आहे. त्यामुळेच रासायनिक खतांच्या विरोधात सरकारी सूर असूनही वापर वाढत असल्याचे खत उद्योगाला वाटते.

शेतकऱ्यांनी २०२२-२३ मध्ये १०.४२ दशलक्ष टन डीएपी व १०.०७ दशलक्ष टन संयुक्त खतांचा वापर केला होता. परंतु चालू वर्षात हाच वापर वाढून अनुक्रमे १०.८६ व ११.०९ दशलक्ष टनावर गेला आहे.

चालू वर्षातील वापराचा वेग पाहिला, तर शेतकऱ्यांकडून ३५.७७ दशलक्ष टन युरिया; तर १.६३ दशलक्ष टन एमओपी यंदा वापरला जाणार आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली नाही. परंतु वापर घटला देखील नाही हे आम्हाला महत्त्वाचे वाटते, असे खत उद्योगाशी संबंधित एका प्रादेशिक व्यवस्थापकाने सांगितले.

शेतकऱ्यांनी खताचा वापर वाढविल्यामुळे सहाजिक देशातील खत निर्मिती कंपन्यांनी काही रासायनिक खतांच्या उत्पादनात देखील वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतील खंत कंपन्यांनी फेब्रुवारी २०२४ पर्यंत युरियात १०.७ टक्के, डीएपी २.५ टक्के, तर नत्र-स्फुरद-पालाश या संयुक्त खताच्या निर्मितीत १.३ टक्क्याने वाढ केली आहे.

देशात गेल्या वर्षी तीन नवे युरिया निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यातून यंदा ३.५ दशलक्ष टन युरिया तयार झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील युरिया उत्पादन साडेनऊ टक्क्यांनी वाढून एकूण ३१.३ दशलक्ष टनांपर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘एसएसपी’च्या वापरात घट

बहुतेक प्रमुख श्रेणींमधील रासायनिक खतांच्या वापरात वाढ झालेली असताना सिंगल सुपर फॉस्फेटच्या (एसएसपी) वापरात घट झाली आहे. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीतील ‘एसएसपी’चा वापर ८.४ टक्क्यांनी घटून ४.८० दशलक्ष टनावर आला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून कंपन्यांनी या खताच्या निर्मितीमध्येदेखील एकूण १८ टक्क्यांनी घट केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT