Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : कुणबी नोंदीचा शोध युद्धपातळीवर

Maratha Kunbi Record Update : मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या शैक्षणिक व महसुली कागदपत्रात कुणबी असा उल्लेख आढळत आहे. जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या शैक्षणिक व महसुली कागदपत्रात कुणबी असा उल्लेख आढळत आहे. जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षाकडून दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी बैठक घेणार असल्याची माहिती या कक्षाचे समन्वयक निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जिथे जिथे मराठा समाजाचा उल्लेख कुणबी असा येतो, त्या कागदपत्रांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यासाठी समन्वयक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना यासंदर्भात आदेश देण्यात आले असून, सर्व रेकॉर्ड रूमची पडताळणी करून मराठा समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आढळणारी कागदपत्रे स्कॅन करून संकलित करण्यात येत आहेत. या कक्षाकडून प्रत्येक तालुक्यातील दप्तराची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी घेणार आज बैठक

मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोमवारी (ता. ६) सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. ज्या मराठा समाज बांधवांचा उल्लेख कुणबी असा सापडला त्यांना कुणबी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT