Milk  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Commission : दूध मूल्य आयोगाची स्थापना करा : डॉ. ढगे

Dr. Ashok Dhage : दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अशोक ढगे यांनी केली आहे.

Team Agrowon

Nagar News : देशात केरळ, पंजाब, हरियाना या राज्यात दुधाला ४० रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक दर दिला जात असताना महाराष्ट्रात मात्र दुधाला अल्प दर देऊन शेतकरी, दूध उत्पादकांची लुट केली केली जात आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अशोक ढगे यांनी केली आहे.

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे छत्रपती संभाजीनगर - नगर महामार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरासाठी दूध ओतून आंदोलन केले. बापूसाहेब डावखर, संदीप फंड, राजेंद्र उदे, वामन खंडागळे, संजय डावखर, काकासाहेब मते, सोमनाथ खंडागळे, शंकर डावखर, शिवाजी मते, शिवप्रसाद मांढरे, स्वागत चव्हाण, यश डावकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. ढगे म्हणाले, देशातील इतर राज्यात दुधाला ४० रुपयांपेक्षा अधिक दर आहे. महाराष्ट्रात मात्र २७ रुपयांच्या आत असा तुटपुंजा दर देऊन गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. सरकारही दुधदराबाबत फारसे गांभिर्याने घेतले जात नाही.

दुग्धविकास विभागाकडून दुधाला चांगला दर मिळण्याची आशा असताना दूध उत्पादकांची जणू सरकार चेष्टाच करत आहे. दूध मूल्य आयोगाची स्थापन केली तर दुधाच्या दराबाबत योग्य निर्णय होऊ शकतो. दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यासाठी दूध मूल्य आयोगाचे संघटन करून त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी, दुग्ध शास्त्रज्ञ, शासनाचे सचिव, यांचा समावेश करावा. एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी ३० ते ३२ रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT