Milk Union: खाजगी दूध संघाचा मनमानी कारभार सुरूच

Milk Rate: राज्य सरकारनं प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पण त्यात अटी शर्थीची पाचर मारली.

Sharad Pawar: उन्हाळ्यात दुधाचं उत्पादन कमी होतं आणि मागणी वाढते. त्यामुळे दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण काही खाजगी दूध संघांनी त्यात मिठाचा खडा टाकला. खरेदी दर कमी १ ते २ रुपयांनी कमी केले. त्यामुळं दूध उत्पादकांच्या मेहनतीत पाणी फेरलं गेलं. काही खाजगी दूध संघ तर १ जुलैपासून दूध खरेदी दर २५ रुपये करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. पण या सगळ्या प्रकाराकडे राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानाडोळा केल्याचं चित्र आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राज्यातील दूध उत्पादकांनी दूध दरासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केलीय. तर विरोधकांनी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादकांचे प्रश्न लावून धरण्यासाठी कंबर कसलीय. दूध दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. तर शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही दूध उत्पादकांची बैठक घेण्याचं जाहीर केलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com