Ajit Navale hunger strike
Ajit Navale hunger strike Agrowon

Milk Rate in Nagar: नगरमध्ये दूध दरासाठी अजित नवले यांचे आमरण उपोषण सुरू

Ajit Navale Hunger strike : दूध दराच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये किसान सभेचे अजित नवले यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे.
Published on

Ahmednagar News : दूध दराच्या प्रश्नासाठी अकोले तालुक्यात जनसंघर्ष संघटनेच्यावतीने चार दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यास किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी पाठिंबा देत रविवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Ajit Navale hunger strike
Milk Rate : कुठे रस्त्यावर दूध ओतून, कुठे शासन आदेशाची होळी, तर कुठे दुग्धाभिषेक', सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

राज्य शासनाने चार महिन्यांपूर्वी दूधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे आदेश काढले होते. परंतु राज्यात दूध डेअरींकडून शेतकऱ्यांना २७ रुपये दिला जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चारा टंचाई, पशु खाद्याच्या वाढलेल्या किमंतींमुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. पण शासन दुधाच्या दराबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्याच्या निषेधार्थ चार दिवसांपासून राज्यभरात दूध उत्पादकांनी शासन आदेशाची होळी केली.

या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा, अशी मागणी दूध उत्पादकांनी केले आहे. दूधाला 34 रुपये प्रति लिटर दर मिळावा, दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खाजगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com