Milk Rate : अहमदनगरमध्ये दुधावरून शेतकऱ्यांचा असंतोष!; दर न दिल्यास विधानसभेला दणका देण्याचा इशारा

Milk Subsidy : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील दुधाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून दुधाचे दर वाढवण्यासह अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Milk Rate
Milk RateAgrowon

Pune News : गेल्या काही महिन्यापासून राज्यात दुधाचे दर कोसळले असून राज्य सरकारकडून कोणत्याच उपाय योजना झालेल्या नाहीत. तर सरकारने दिलेले अनुदान कागदावर राहिले आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष दिसत आहे. याच असंतोषचा उद्रेक अहमदनगरमध्ये मंगळवारी (ता.२५) झाला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी दूध उत्पादकांनी आंदोलने केली. हरेगाव फाटा येथे देखील रस्त्यावर उतरून दूध उत्पादकांनी जोरदार आंदोलन केले. तसेच आपल्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विधानसभेला धडा शिकवू, असा गर्भीत इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. काळे यांनी दिला आहे.

राज्यातील दूध उत्पादकांमध्ये दूधाच्या दरावरून सरकारवर रोष आहे. अनेक वेळा आंदोलने आणि निवेदने देऊनही सरकराने यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी नेते आणि विरोधकांकडून टीका होत आहे. यादरम्यान नगरमध्ये शेतकरी संघटनेकडून दूध दरावरून राण उठवण्यात आले होते. गेल्या १५ दिवसापासून दूध दरावरून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू होते. तर शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. तसेच तालुक्यात दूध उत्पादकांमध्ये जनजागृती करून हरेगाव फाटा येथे रास्ता रोकोची हाक शेतकरी संघटनेने दिली होती.

Milk Rate
Milk Rate Issue : दूधदर वाढवून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

त्यानंतर काळे यांच्या नेतृत्वात हरेगाव फाटा येथे शेकडो दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. यावेळी राज्य सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा विचार करावा. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत दूध उत्पादक राज्य सरकारला दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा काळे यांनी दिला.

या आंदोलनामुळे नेवासे-श्रीरामपूर राज्यमार्गावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांना आंदोलकांनी मागण्याचे निवेदन दिले. यावेळी दूध उत्पादकांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहचवल्या जातील. मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सोनवणे यांनी दिली. सोनवणे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Milk Rate
Milk Rate : दूध दराच्या मुद्द्यावरून पुन्हा किसान सभा आक्रमक, अजित नवलेंनी दिला इशारा

नेवासेमध्येही दूध दर तापला

नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावर देखील दूध दराचा प्रश्न तापला. येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले.

कुर्डुवाडीतही दूध आंदोलन

दरम्यान दुधाच्या दरावरून अहमदनगरबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीतही दुधाच्या दरावरून आंदोलन झाले. पुणे-लातूर मार्गावर दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले. तर दुधाचे पडलेले दर सुधारून दुधाचे दर वाढवावेत आणि रखडलेले अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. यावेळी पुणे-लातूर मार्ग दोन तास ठप्प झाला होता.

गेल्या काही महिन्यापासून राज्यातला दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या पडणाऱ्या दरामुळे मेटाकुटीला आला आहे. तर दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे. यात दूध भेसळ करणाऱ्यांचा मोठा हात आहे. त्यांच्यावर कार्यवाही करावी. प्रति लिटर थकलेले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावे.

- बापूसाहेब डावखर, दूध उत्पादक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com