PM Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेतील त्रुटींचा शेतकऱ्यांना फटका

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान योजनेतील तांत्रिक त्रुटींचा फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील विशेषतः माळशिरस, राजुरी, मांढर या गावांतील शेतकऱ्यांना तर व्हिलेज कोड व तालुका कोड बदलामुळे यापूर्वी योजनेच्या लाभाचा हप्ता मिळूनही सध्या वंचित राहण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाकडून ही योजना कृषी विभागाकडे आल्यानंतर ते यासाठी प्रयत्न करत आहे.

केंद्र शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर सर्रास शेतकऱ्यांनी यासाठी आपले अर्ज केले. शासनाने देखील हे प्राधान्याने मंजूर करत अर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये आणत त्यांना लाभ सुरू केला. योजनेच्या चौदाव्या हप्त्यानंतर शासनाने केलेल्या बदलानुसार महसूल विभागाकडून तालुका कृषी विभागाकडे ही योजना हस्तांतर झाल्यानंतर त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले.

कृषी विभागाकडे ही योजना हस्तांतर होताना तालुक्यात फक्त २६,००० पात्र लाभार्थी लाभ घेत होते. त्यानंतर कृषी विभागाकडे आल्यानंतर आता सद्यःस्थितीत पुरंदर तालुक्यात ३३,००० लाभार्थी योजनेचा लाभ येत आहेत.

पात्र असणारे लाभार्थी आधार अपडेटिंग, बँक केवायसी व लाभार्थी क्षेत्र निश्चिती अशा वेगवेगळ्या कारणांनी कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी आपला योजनेचा हप्ता परत कसा सुरू होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

माळशिरस, राजुरी व मांढर या तीन गावांतील व्हिलेज कोड व तालुका कोड बदलांमुळे या ठिकाणाचे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून कमी झाले आहेत. यासाठी माळशिरसच्या सरपंच आरती यादव व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव यांनी दोनच दिवसांपूर्वी आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या योजनेतील समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम लावण्याची विनंती त्यांच्याकडे गेली.

योजनेतील बदलानुसार कृषी विभागाकडे योजना आल्यानंतर आम्ही या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी समाविष्ट होण्यासाठी काम करत आहे. व्हिलेज तालुका कोडचा बदल झालेल्या गावातील लाभार्थ्यांना देखील परत योजनेत समाविष्ट करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. माळशिरस, राजुरी, मांढर येथीलही पात्र लाभार्थी योजनेत येतील. महिन्याभरात तीन हजार लाभार्थी नव्याने योजनेत पात्र होतील
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी
माळशिरस गावातील निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची योजनेच्या सुरुवातीला सुरू झालेले हप्ते बंद झाले आहेत. यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करून स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचे सांगितले आहे. प्रसंगी शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत प्रशासन आंदोलन करेल.
- आरती यादव, सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

Sweet Potato : नवरात्रीला ‘शाहूवाडी’ रताळ्यांचा गोडवा

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

SCROLL FOR NEXT