Sand Depot  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Depot : सतरा वाळू डेपोंना पर्यावरणाची अनुमती

Sand Depot Environmental Clearance : नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत.

Team Agrowon

Nanded News : नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत. त्यापैकी सात गाळमिश्रीत वाळू डेपोमधून गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध होईल तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

राज्य शासनाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍‍ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत.

यामध्‍ये बिलोली, देगलुर, माहुर, हदगाव व हिमायतनगर तालुक्‍यातील १७ वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोंना पर्यावरण अनुमती प्रदान करण्‍यात आली आहे. तर उर्वरित सात वाळू डेपो नांदेड व लोहा तालुक्‍यातील गाळमिश्रीत वाळू डेपो आहेत. या गाळमिश्रीत वाळू डेपोमधुन गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे.

नियमित वाळू डेपो

बिलोली तालुका : येसगी, गंजगाव, कार्ला बुद्रुक, नागणी, माचनुर, सगरोळी, बोळेगाव, येसगी, हुनगुंदा. देगलूर तालुका : तमलुर, मेद्दनकल्‍लुर, शेवाळा, शेळगाव, शेखापुर. हदगाव तालुका : बेलमंडळ, गोर्लेगांव, बाभळी, बनचिंचोली, बेलमंडळ, गुरफळी. माहूर तालुका : केरोळी, टाकळी, लांजी, कोळी, सायफळ. हिमायतनगर तालुका : विरसणी, पिंपरी, कामारी, दिघी, घारापुर, रेणापुर, सिरपल्ली ज., डोलारी, बुंदली बे., कौठा, धानोरा ज., पळसपुर. उमरी तालुका : बळेगाव.

गाळमिश्रित डेपो

नांदेड तालुका : वाघी, रहाटी बु., सोमेश्‍वर, जैतापुर, थुगांव, हस्‍सापुर, कोटीतीर्थ, बोरगांव तेलंग. खुपसरवाडी, वाहेगांव, भणगी, गंगाबेट, असर्जन, विष्‍णुपुरी, मार्कंड, पिंपळगांव मि., कौठा. भायेगाव, राहेगाव, नागापुर, पुणेगाव, ब्राम्‍हणवाडा, त्रिकुट, बोंढार तर्फे हवेली, सिद्धनाथ, वांगी, किकी. लोहा तालुका ः बेटसांगवी, शेवडी, येळी, पेनुर, मारतळा, कौडगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Ranbhaji Festival: हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

Jalna Scam: जालना जिल्ह्यात २४ कोटींच्या घोटाळ्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन

Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT