Girish Chitale Agrowon
ॲग्रो विशेष

CII Maharashtra Appointment: उद्योजक गिरीश चितळे यांची ‘सीआयआय’ परिषदेवर निवड

Girish Chitale: गिरीश चितळे यांची ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII) महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झाली आहे. चितळे डेअरीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुग्ध व्यवसाय आणि कृषी प्रक्रियेतील योगदानामुळे उद्योग व ग्रामीण विकास क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Team Agrowon

Sangli News: येथील बी. जी. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांची कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय)महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झाली आहे. ‘सीआयआय’ ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक संघटना असून, १८९५ पासून उद्योग व व्यवसायाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहे.

भारत सरकार राज्य सरकार व विविध उद्योग संस्थांशी भागीदारी करून धोरण निर्मिती, कौशल्यविकास, संशोधन, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी वाढवणे यासाठी ‘सीआयआय’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. महाराष्ट्र राज्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक वाढ, कृषी आणि ग्रामीण विकास, तसेच स्टार्टअप आणि उद्योजिकतेला चालना देण्यावर भर दिला जातो.

चितळे डेअरी हा १९३९ मध्ये स्थापन झालेला व चार पिढ्यांचा वारसा असलेला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कृषी प्रक्रिया व दुग्ध व्यवसाय समूह आहे. उच्च दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थांसह शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सक्षमीकरणावर हा उद्योग भर देतो. डेटा-अनॅलिटिक्सवर आधारित दूध संकलन प्रणाली, पशुपालन व्यवस्थापनासाठी डिजिटायझेशन, तसेच स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर चितळे डेअरीची वैशिष्ट्ये आहेत. गिरीश चितळे हे व्यवस्थापन आणि विपणन क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेले उद्योजक आहेत.

संचालक म्हणून कृषी व ग्रामीण उद्योजकतेला नवे दृष्टिकोन देण्यासाठी कौशल्यविकासाच्या नव्या संधी शोधणे, तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादनक्षमता वाढवणे व धोरणात्मक निर्णय घेत राज्यातील उद्योग, कृषी आणि ग्रामीण विकासाला गती देणे यावर भर राहील.
गिरीश चितळे, उद्योजक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Cotton Import: कापूस आयातीवरील शुल्क हटवले

Amitabh Pawade Death: अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन

MahaDBT Portal: महाडीबीटीमधील गोंधळामुळे फलोत्पादन संचालकही हैराण

Maharashtra Heavy Rain: पीक नुकसानीसह चिंताही वाढली

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार

SCROLL FOR NEXT