Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस
Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतर कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला आहे. न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि इतर संबधितांना नोटीस बजावली आहे.