Har Ghar Jal Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Har Ghar Nal Yojana : ‘हर घर जल’ योजनेच्या कामांसाठी मार्चअखेरची मुदत

Har Ghar Nal Scheme Update : हर घर नल योजनेतून जिल्ह्यातील ७५ हजार ४४७ कुटुंबांना नळजोड देण्याचे उद्दिष्ट असून, फेब्रुवारीअखेर ६३ हजार २३९ कुटुंबांना नळजोड दिलेले आहेत.

Team Agrowon

Solapur News : हर घर नल योजनेतून जिल्ह्यातील ७५ हजार ४४७ कुटुंबांना नळजोड देण्याचे उद्दिष्ट असून, फेब्रुवारीअखेर ६३ हजार २३९ कुटुंबांना नळजोड दिलेले आहेत.

उर्वरित १२ हजार २०८ कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे. मुदतीत कामे न झाल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

यंदा पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर हर घर नल योजनेची कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिले आहे. मुदतीत कामे पूर्ण न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

तसेच सरकारने जलजीवन मिशनअंतर्गत ८५५ कामांना मंजुरी दिली होती. त्यापैकी २३६ कामे पूर्ण झाली आहेत. तर १५१ ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर २५ टक्के कामे झालेली ५०, ५० टक्के १९५, ७५ टक्के कामे झालेली १८६ कामे आहेत. यासाठी मंजूर १९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

गतवर्षी ३९८ टँकर, यंदा केवळ २१

जलजीवन मिशन व हर घर नल योजनेच्या कामामुळे यंदा टँकरची संख्या घटल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा प्रशासनाने सांगितले. गतवर्षी मार्च महिन्यात ३९८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यंदा केवळ २१ टँकर सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT