Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : नागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

Team Agrowon

Sugarcane Season Update : लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील श्रीगोंदा फॅक्टरी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांच्या नोंदीच्या सर्व उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून २०२३-२४ या ४९ व्या गळीत हंगामाची सांगता रविवारी (ता.२४) दुपारी सांगता करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सतीश जांभळे यांनी सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,उपाध्यक्ष बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस तोड मजुरांच्या मोठ्या अडचणीवर मात करून, हा हंगाम यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे

कारखान्यात सहवीज निर्मिती प्रकल्पामधून ४,६९,८४,९०० युनिट वीज निर्मिती झाली. त्यापैकी २,७९,८२,७८२ युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधून २०,५५,४२१ ब.लि. रेक्टीफाईड स्पिरीट उत्पादन झालेले आहे.

त्याकरिता ७,६३१.०७८ टन मळीचा वापर करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सर्व खाते प्रमुख तसेच कामगार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT