MP Nilesh Lanke  Agrowon
ॲग्रो विशेष

MP Nilesh Lanke : अहिल्यानगरमध्ये नोटीसशिवाय कारवाई? अतिक्रमण पाडण्यावरून खासदार लंके आक्रमक

Encroachment : अहिल्यानगर शहरासह जि्ल्ह्यातील अनेक मोठ्या गावांत प्रशासनाकडून अतिक्रमणे काढली जात आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस व महसूल प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरिकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे, असा आरोप करत जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिक्रमण पाडण्याच्या मोहिमेविरोधात लंके यांनी अक्रमक भूमिका घेतली. अहिल्यानगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोपही लंके यांनी केला.

अहिल्यानगर शहरासह जि्ल्ह्यातील अनेक मोठ्या गावांत प्रशासनाकडून अतिक्रमणे काढली जात आहेत. अतिक्रमणे काढताना कोणत्याही नोटिसा न देता प्रशासन अचानक अतिक्रमणे काढून लोकांवर अन्याय करत असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी या विरोधात अक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना खासदार लंके म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस, महसूल प्रशासनाचा वापर सत्ताधारी करत आहेत. नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हाणनगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे मंगल कार्यालय उद्ध्वस्त केले. नागरिकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी अतिक्रमण काढली जात आहेत.

अतिक्रमण आहे हे सिद्ध करून ती पाडण्याबाबत जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहेत. भगत यांचे अतिक्रमण पाडताना एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंबे ५० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

कायद्याचा दुरउपयोग करून या आदिवासी बांधवांच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे जमीनदोस्त करण्यात आले.

ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय अकासापोटी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे सर्व थांबले पाहिजे. राजकारण सुरू राहील. सत्ता आज ना उद्या येईल. अधिकाऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांमध्ये समतोल ठेवला पाहिजे. या वेळी लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे काम केले नाही, अशा लोकांना ठरवून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकूण न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. वेगळ्या पद्धतीने समाजाला वेठीस धरले जाणार असेल तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील.
- नीलेश लंके, खासदार, अहिल्यानगर (दक्षिण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke Demands: अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात नीलेश लंकेंचे आंदोलन

Sugarcane Crushing Update: सातारा जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Animal Crematorium: पशूंच्या स्मशानभूमीचा शासननिर्णय कागदावरच!

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या एक हजार जादा बसेसची व्यवस्था- मंत्री प्रताप सरनाईक

Crop Damage Compensation: पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT