Agriculture Education Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Engineering Education : कृषी अभियांत्रिकी शाखेतील रोजगार

Agriculture Education : कृषी अभियांत्रिकी शाखेचा पदवी अभ्यासक्रम हा बारावीनंतर ४ वर्षांचा आहे. ही पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध खासगी तसेच शासकीय क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

Team Agrowon

डॉ. हेमंत देशमुख

Indian Economy : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आधुनिक व शाश्‍वत तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे.

कृषिशास्त्र, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे ‘कृषी अभियांत्रिकी’ (बी.टेक. कृषी अभियांत्रिकी). राज्यातील ४ कृषी विद्यापीठांमध्ये ५ शासकीय आणि १५ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी शासकीय महाविद्यालयामध्ये ३०४, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये ८८० इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.

कृषी अभियांत्रिकी शाखेचे महत्त्व

कृषी शास्र व अभियांत्रिकीचा एकत्रित वापर करून पर्यावरणाला हानी न पोहोचविता, नैसर्गिक संसाधनांच्या मदतीने कृषी विकास साधणे ही कृषी संशोधनाची मुख्य संकल्पना आहे.

कृषी क्षेत्राचे यांत्रिकीकरण, विविध अन्नधान्य पिके, फळे, भाजीपाला, फुले इ.चे संवर्धन तसेच अन्नधान्य प्रक्रिया अशा विविध पर्यायांची रचना आदी प्रमुख कार्ये कृषी अभियांत्रिकीच्या मदतीने केली जातात. उपग्रहाद्वारे मिळणारी हवामान व इतर कृषिविषयक माहिती संकलित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते.

प्रवेश प्रक्रिया , पात्रता

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी (JEE/ MHT-CET/ AIEEA-UG) या पात्रता प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांनी देणे बंधनकारक आहे. यासाठी इयत्ता बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र (PCMB) हे विषय घेणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान ५० टक्के आणि मागास प्रवर्गासाठी किमान ४० टक्के गुणांनी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा.

अभ्यासक्रम

अभ्यासक्रम ४ वर्षांचा असून, त्याची ८ सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रम १८३ क्रेडिट्चा असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. कृषी अभियांत्रिकी पदवी मिळते.

प्रमुख विभाग

१) कृषी यंत्रे व शक्ती विभाग

२) अपारंपरिक ऊर्जा विभाग

३) प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी विभाग

४) सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग

५) मृद् व जलसंधारण विभाग

रोजगाराच्या संधी

अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रासह सरकारी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. कृषी आस्थापना, सरकारी व निमसरकारी आणि सहकारी आस्थापना, केंद्रीय कृषी आस्थापना, बँक व विमा क्षेत्र इ. क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

- केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थामध्ये कृषी शास्रज्ञ, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय व राज्यस्तरीय कृषी व संलग्न विभाग, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी माल साठवणुकीसाठी शीतकरण, कृषी माल निर्यात व निविष्ठा पुरवठा केंद्र, ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिझनेस सेंटर, ठिबक, तुषार सिंचन पुरवठा केंद्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कृषी यंत्रे यांची डीलरशिप व ट्रेडिंग, बीज प्रक्रिया व कृषी उद्योग विकास महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जलसंधारण व पाटबंधारे विभाग.

- याशिवाय यूपीएससी, एमपीएससी व स्टाफ सिलेक्शन, बँक व विमा क्षेत्र, मंत्रालयीन अधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग या ठिकाणी कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून संधी आहेत. कृषी सेवा, वनसेवा, नाबार्ड या परीक्षा खास पदवीधरांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत.

कृषी अभियांत्रिकीतील उद्योजक किंवा स्वयंरोजगार

एकूणच कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही विपुल आहेत. कल्पकता व कृषी तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादन, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात इत्यादी व्यवसायांमध्ये कृषी अभियंते स्वतःचे वेगळी निर्माण करू शकतात.

विविध कृषी अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रे यांचे उत्पादन किंवा डीलरशिप व ट्रेडिंग, प्रक्रिया उद्योग उभारणी, कृषी माल साठवणूक, शीतकरण सेवा, कृषी माल निर्यात, कृषी निविष्ठा पुरवठा केंद्र, हरितगृह, पॉलिहाऊस, शेडनेट उभारणी, आधुनिक गोठा, कुक्कुटपालनगृह उभारणी यामध्येही संधी आहेत.

संपर्क - डॉ. हेमंत देशमुख, (लेखक के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT