Honey Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Honey Collection : सेंद्रिय मध संकलनातून महिलांना रोजगाराच्या संधी

Honey Update : सेंद्रिय मध संकलनाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे.

Team Agrowon

Satara Honey News : सेंद्रिय मध संकलनाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे. कांदाटी खोऱ्यात मध उद्योगासाठी मोठी क्षमता उपलब्ध आहे.

विशेषकरून महिलांनी स्वजबाबदारी सांभाळून मध पेट्यातून मधमाश्‍या पाळून सेंद्रिय मध गोळा करून हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, असे मत तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी व्यक्त केले.

वाळणे (ता. महाबळेश्‍वर) येथे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्‍वर व मध संचालनालयाकडून ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत मधमाश्‍यापालन प्रशिक्षण आणि जन जागृती शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरात कांदाटी- कोयना खोऱ्यातील रेनोशी, खरोशी, कोठ्रोशी, दाभे, रुळे, आवळन आहिर, गावढोशी, दरे, निवळी, आकल्पे, लामज, वागावळे, ऊचाट, सालोशी आदी गावांतील सुमारे २०० मधपालक, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील म्हणाले, मध व्यवसाय करण्यासाठी ५० टक्के शासन अनुदान मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण विनामूल्य असून, महिला व पुरुष सर्वांसाठी उपलब्ध आहे.

कृषी पर्यवेक्षक एम. बी. पाटील, कृषी सहायक रिकेश पाटील यांनी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण दिले. सेंद्रिय मध संकलक नावनोंदणी करण्यात आली व मध केंद्र योजनेअंतर्गत मध पेट्यांची मागणी घेण्यात आली.

या वेळी सुनील नलावडे, आनंद नलावडे, विठ्ठल सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. आर्या नलावडे, प्रतीक कांबळे, शैलेश नलावडे, आर्यन नलावडे, उज्ज्वला सपकाळ या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सरपंच आवेश ढेबे, उपसरपंच लक्ष्मी नलावडे, पांडुरंग सुतार, तुळशीराम शेलार, शंकर मानाजी वाळणेकर, प्रकाश सपकाळ, विजय खरात, गजानन भोयर आदी उपस्थित होते. रघुनाथ नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील नलावडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT