Sahyadri tiger Reserve  Agrowon
ॲग्रो विशेष

Employment Generation : ‘सह्याद्री व्याघ्र’मधील गावांत पर्यटनातून रोजगार निर्मिती

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील अनेक गावांत पर्यटनातून रोजगार व उत्पन्नवाढीसाठी प्रस्तावांना व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यामध्ये ही मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील अनेक गावांत पर्यटनातून रोजगार व उत्पन्नवाढीसाठी प्रस्तावांना व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यामध्ये ही मान्यता देण्यात आली.

पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व या बाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला, तसेच वन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता ३५ सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या अनुषंगाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांना निसर्ग पर्यटनातून रोजगार व उत्पन्नवाढीसाठी अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

त्यामुळे या भागातील गावांत रोजगार संधी निर्माण होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विविध विषयांवर बैठक झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव व्हीसीद्वारे उपस्थित होते.

प्रस्तावित ५ निसर्ग पर्यटन झोन कांदाट, मुनावळे, बामणोली, कारवट, कुसवडे, कोयना हेळवाक, पानेरी भोसगाव, सांगलीतील मणदूर, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत मिळून असलेला आंबा अशा एकूण सात निसर्ग पर्यटन झोन व झोननिहाय असलेल्या निसर्ग पर्यटन संकुल, स्थळे आणि पर्यटन वाढीस पूरक उपक्रम यांना मान्यता देण्यात आली.

जल पर्यटनासाठी ४५ कोटींचा प्रस्ताव

शिवसागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या ४५ कोटी ३८ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. कोयना व वारणा नदी पात्रामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणांती विविध जल पर्यटन विषयक उपक्रम सुरू करण्यास समितीने मान्यता दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT