Dr.Anil Bhikane  Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Poultry Farming : शेळी, कुक्कुटपालनावर भर द्यावा : डॉ. भिकाने

Dr.Anil Bhikane : दरडोई प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी अंडी व मांस उत्पादन वाढवावे लागेल. त्यासाठी शेळी व परसातील कुक्कुटपालन हे व्यवसाय वृद्धिंगत करावे लागतील, असे प्रतिपादन डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : दरडोई प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी अंडी व मांस उत्पादन वाढवावे लागेल. त्यासाठी शेळी व परसातील कुक्कुटपालन हे व्यवसाय वृद्धिंगत करावे लागतील, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

जागतिक बँक अर्थसाह्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेळी व कुक्कुटपालन सुधारण्यासाठी पशुसखींचे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम याअंतर्गत शेळी व परसातील कुक्कुटपालन या विषयावर पशुसखींचे पहिले पंधरादिवसीय निवासी प्रशिक्षणाचा समारोप मंगळवारी (ता. ६) पशुवैद्यकीय महाविद्यालयात झाला.

या वेळी डॉ. भिकाने ऑनलाइन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब नरळदकर होते. प्रकल्प सहसमन्वयक डॉ. सुनीत वानखेडे, डॉ. प्रल्हाद वानखेडे, प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. साजिद अली यांची उपस्थिती होती. आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तलयातील स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. कल्पना करगावकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

डॉ. भिकाने म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्गत ७०० महिला संचालक, सभासदाना राज्यातील ६ पशुवैद्यक महाविद्यालयाद्वारे पशुसखींचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्या बळकट होतील. ग्रामीण भागाच्या प्रगतीस मदत होईल. या वेळी शेळी आणि परसातील कुक्कुटपालन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पशुधनांवरील प्रथमोचारासाठी किटचे वाटप पशुसखींना करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. वानखेडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT