Vegetable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : बारमाही भाजीपाला लागवडीवर भर

Vegetable Farming : अल्पभूधारक शेतकरी सुदाम माने विविध भाजीपाला पिकांचे बारमाही उत्पादन घेतात. दर्जेदार मालाची प्रतवारी करून बाजारपेठत दररोज स्वतः विक्री करतात.

माणिक रासवे

Vegetable Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : भाजीपाला

शेतकरी : सुदाम नागोराव माने

गाव : पिंपरी देशमुख, ता.जि. परभणी

एकूण क्षेत्र : ४ एकर

भाजीपाला लागवड : १ एकर

अल्पभूधारक शेतकरी सुदाम माने विविध भाजीपाला पिकांचे बारमाही उत्पादन घेतात. दर्जेदार मालाची प्रतवारी करून बाजारपेठत दररोज स्वतः विक्री करतात. त्यामुळे अधिक फायदा होत आहे.दरवर्षी उन्हाळ्यात साधारण १ एकरावर विविध भाजीपाल्याची लागवड केली जाते. सध्या गिलके आणि चुका यांचे उत्पादन अंतिम टप्प्यात असल्याचे सुदामराव सांगतात.

बारमाही भाजीपाला उत्पादन

वर्षभर २ एकरांवर विविध भाजीपाला पिकांची लागवड असते. त्यात पालक, कोथिंबीर, चवळी, भेंडी, कोबी, कांदा, लसूण, बीटरूट, गाजर, रताळी इत्यादींसह गाजर आणि रताळे लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यापासून चवळी, बीटरूट, पालेभाज्यामध्ये चुका, पालक, शेपू, कोथिंबीर, तर वेलवर्गीय भाज्यामध्ये गिलके, दोडका उत्पादन घेतले आहे.

प्रतवारी व स्वच्छतेवर भर

शेतीमालाची प्रतवारी केल्यास अपेक्षित दर मिळतात. यासाठी काढणीनंतर शेतामध्ये भाजीपाल्याची प्रतवारी करून नंतर पॅकिंग केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे वाहनामध्ये माल भरून विक्रीसाठी घेऊन जातात.

कुटुंबाची भक्कम साथ

सुदाम माने यांचे वडील नागोराव, आई सौ. पार्वती, पत्नी सौ. विमल, भाऊ अंकुश हे सर्वजण शेती कामे करतात. अंकुश हे दिव्यांग असून देखील शेतातील अनेक कामांमध्ये मदत करतात. कुटुंबाच्या मदतीमुळे मजुरीवरील खर्चात बचत होते.

गिलके लागवड

साधारण ३० गुंठे क्षेत्रामध्ये गिलके लागवड केली आहे. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान ३० गुंठे क्षेत्रावर केलेली गिलके लागवडीपासून आत्तापर्यत उत्पादन घेत होतो. मागील साधारण २० दिवसांपूर्वी ३० गुंठ्यांवर पुन्हा गिलके लागवड केलेली आहे.

लागवडीसाठी बेड तयार करून ड्रीपच्या नळ्या अंथरून घेतल्या. त्यानंतर बेड चांगले भिजवून घेऊन नंतर बियांची टोकण केली.

लागवड ४ बाय अडीच फूट अंतरावर केली आहे. दोन रोपांमध्ये अडीच फूट अंतर राखले आहे. त्यानंतर घरीच तयार केलेल्या गांडूळखताचा वापर केला.

बियाणे लागवडीनंतर रोपांची वाढ चांगली होण्यासाठी शिफारशीत घटकांचा वापर केला जातो.

लागवडीनंतर २० दिवसांनी वेलींना आधार मिळण्यासाठी मांडव तयार केले जातात.

गिलके पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. आवश्यकता भासल्यास एखादी फवारणी घेतली जाते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

गिलके रोपे तीन पानांवर आल्यानंतर ड्रीपद्वारे १९ः१९ः१९ आणि फुटी येण्यासाठी १२ः६१ः० चा वापर केला जातो. दर्जेदार उत्पादनासाठी मॅग्नेशिअस, पोटॅश यांचा वापर केला जातो. त्यामुळे गिलक्यांना चकाकी येऊन चांगले दर मिळण्यास मदत होते.

हातविक्रीवर अधिक भर

हंगामी तसेच वर्षेभर उत्पादन मिळेल अशा पिकांची सांगड घातल्यामुळे दररोज विक्रीसाठी भाजीपाला उपलब्ध होतो. परभणी येथील वसमत रस्त्यावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची व्यवस्थित मांडणी करून सुदाम माने हे स्वतः हातविक्री करतात. ग्राहकांना थेट विक्री केल्यामुळे घाऊक मार्केटमधील दरांपेक्षा अधिक दर मिळतो.

सुदाम माने, ८६६८४८१०४२

(शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT