Soybean Seed Processing Campaign  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Soybean Seed Processing Campaign : आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने तालुक्यात सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम उघडण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने तालुक्यात सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम उघडण्यात आली आहे. या अनुषंगाने मंगळवारी (ता.१४) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या उपस्थितीत मोहिम सुरू केली.

तळेगाव बाजार येथील येथील प्रगतिशील शेतकरी जनार्दन खारोडे यांच्या निवासस्थानी घरगुती सोयाबीन बियाण्यांची बीज प्रक्रिया करण्यात आली. सोयाबीनची उगवण शक्ती तपासणी कृषी वसंत अभियानांतर्गत कृषी विभागाने आधीच केलेली आहे.

कृषी विभागामार्फत विविध खासगी कंपन्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या गावांमध्ये स्वयंचलित बीज प्रक्रिया करून देणारे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचे गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

तळेगाव येथे श्री. किरवे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उगवणशक्ती तपासणी तसेच बीज प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. बीबीएफ व टोकन पद्धतीने लागवड करून उत्पादन वाढ करावी असे आवाहन केले.

तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टीने करावयाचे नियोजनाबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली. कृषी सहाय्यक मनोजकुमार सारभूकन यांनी बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सतीश दांडगे, मंडळ कृषी अधिकारी संजय अटक, कृषी सहाय्यक प्रदीप तिवाले हेही उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT