BBF Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

BBF Sowing : बीबीएफद्वारे पेरणीवर भर

Broad Bed Furrow : वाशीम जिल्ह्यातील चांदई (ता. मंगरुळपीर) येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप फुके हे मागील अनेक वर्षांपासून हरभरा लागवड करत आहेत.

 गोपाल हागे

शेतकरी नियोजन पीक- हरभरा

शेतकरी ः दिलीप नारायणराव फुके

पत्ता ः चांभई, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम

एकूण क्षेत्र ः २५ एकर

हरभरा लागवड ः ७ एकर

वाशीम जिल्ह्यातील चांदई (ता. मंगरुळपीर) येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप फुके हे मागील अनेक वर्षांपासून हरभरा लागवड करत आहेत. हरभऱ्याचे एकरी सरासरी १० ते १२ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन ते घेतात. यावर्षी त्यांनी सात एकरात हरभऱ्याची १७ ते १८ ऑक्टोबरला पेरणी केली आहे.

लागवड नियोजन

- खरिपात सोयाबीनची लागवड बीबीएफच्या साह्याने केली होती. त्यामुळे जास्त पाऊस होऊनही पिकाचे नुकसान झाले नाही. एकरी ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. सोयाबीन काढणीनंतर याच शेतात हरभरा लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार पेरणीपूर्व मशागत केली.

- रोटाव्हेटर मारून शेतातील काडीकचरा बारीक केला. नंतर वाफसा मिळताच बीबीएफ यंत्राच्या साह्याने हरभऱ्याची पेरणी केली.

- दोन ओळींत १८ इंच अंतर आणि दोन बियाणांत तीन ते चार इंच इतके अंतर राखत १७ ते १८ ऑक्टोबरला पेरणी केली.

- पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून घेतली.

- पेरणी करताना बियाण्यासोबतच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात डीएपी एकरी ५० किलो प्रमाणात दिले.

सिंचन नियोजन ः

बीबीएफवर हरभरा लागवड केली असल्याने एकाच ठिकाणी तीन तास स्प्रिंकलर ठेवत ओलित केले. या पद्धतीने सिंचन केल्यास हरभरा उगवणीसाठी फायदेशीर ठरते. बियाणे पेरणीची खोली तीन ते चार इंचावर ठेवली आहे. त्यामुळे लवकर उगवण होण्यास मदत होते संपूर्ण क्षेत्रातील उगवण चांगली होण्यासाठी काही दिवसांच्या अंतराने हलक्या स्वरूपात सिंचन करण्यावर भर देण्यात आला. सध्या पिकाची उगवण होऊ लागली आहे. लवकरच पीक ताशी लागेल.

आगामी नियोजन ः

- उगवणीनंतर पिकाला पाण्याचा हलकासा ताण दिला जाईल. पिकात उगवलेले तण काढण्यासाठी निंदणी केली जाईल. तसेच योग्य वाफसा तयार झाल्यानंतर डवरणी केली जाईल.

- डवरणी केल्यानंतर पाण्याची पाळी दिली जाईल.

- हरभरा पिकाच्या कोवळ्या रोपांवर तुडतुडे, पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.

- हरभरा लागवडीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना केल्या जातात.

- पिकाची अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरावर भर दिला जाईल.

- आवश्यकतेनुसार नत्राची मात्रा म्हणून एकरी २५ किलो युरिया दिला जाईल.

दिलीप फुके, ९९२२०१०३९९ (शब्दांकन ः गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT