Kaju Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : शासकीय रोपवाटिकेतून कलम खरेदीवर भर

Cashew Production : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे येथे (ता. वैभववाडी) रवींद्र पवार यांची ५ एकर जमीन आहे. त्यातील एक एकर दहा गुंठे क्षेत्रात यावर्षी वेंगुर्ला सात या जातीच्या १०० काजू कलमांची लागवड केली आहे.

एकनाथ पवार

Cashew Cultivation Management :

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : रवींद्र पवार

गाव : खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

काजू लागवड : १ एकर १० गुंठे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे येथे (ता. वैभववाडी) रवींद्र पवार यांची ५ एकर जमीन आहे. त्यातील एक एकर दहा गुंठे क्षेत्रात यावर्षी वेंगुर्ला सात या जातीच्या १०० काजू कलमांची लागवड केली आहे.

लागवडपूर्व नियोजन

लागवडीपूर्वी एप्रिल महिन्यात लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीवरील लहान मोठी झुडपे काढून घेतली. मे च्या पहिल्या आठवड्यात २१ बाय २१ फूट इतके अंतर राखत लागवडीसाठी खड्डे खोदून घेतले.

काढलेले खड्डे मे महिन्याच्या अखेरीस शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि निंबोळी पेंड यांचा वापर करून खड्डे भरून घेतले.

यावर्षी मॉन्सून साधारण ६ जूनला दाखला झाला. त्यापुढील दोन दिवसांनी जोरदार पाऊस झाला. हलक्या सरी सुरू झाल्यानंतर काजू लागवडीचा निर्णय घेतला.

लागवडीसाठी शासनमान्य रोपवाटिकेतून वेंगुर्ला सात या जातीच्या काजू कलमांची खरेदी केली. १० जूनपासून कलम लागवड करण्यास सुरुवात केली.

अलगदपणे काजू रोप खड्ड्यामध्ये ठेवण्यात आले. हलक्या हाताने रोपाच्या आजूबाजूला माती पसरून रोपाच्या बाजूने माती दाबली. जेणेकरून रोप हलणार नाही आणि त्याला आधार मिळेल.

लागवडीनंतर रोपांना आधार मिळण्यासाठी लगेच बांबूची काठी प्रत्येक रोपाच्या बाजूला उभी करून त्या काठीला रोप बांधून घेतले.

आगामी नियोजन

सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लागवड केलेल्या रोपांच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी लागवड क्षेत्रातून पाणी बाहेर जाण्यासाठी चर काढले आहेत.

लागवड केलेली नवीन रोपे साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत जमिनीत स्थिर होतील. रोप स्थिरावण्याच्या काळापर्यंत रोपांची विशेष काळजी घेतली जाईल.

ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी झाल्यावर तण काढले जाईल.

त्यानंतर झाडांच्या पाण्याचे नियोजन केले जाईल. चार ते पाच दिवसांतून एकदा सिंचन केले जाईल.

रोपांना आधार म्हणून लावलेल्या काठ्या काढून त्याजागी नवीन काठ्या लावल्या जातील.

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून नवीन लागवडीस पालवी येण्यास सुरुवात होईल. या पालवीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

रवींद्र पवार ९६६९९१२८८६

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : विश्रांतीनंतर जोरदार बरसला! दोन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Warehouse Receipt: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व

Modified Atmosphere Packaging: सुधारित वातावरण पॅकेजिंगच्या क्षमता, गुणधर्म

Onion Price: कांदादरासाठी खणखणले फोन; मंत्री, लोकप्रतिनिधी जेरीस

Agriculture Scientists: शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

SCROLL FOR NEXT