Intercropping Agriculture System Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Intercropping System : मिश्रपीक पद्धतीत सेंद्रिय खतांवर भर

Organic Fertilizers : रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे मिलिंद मोहन पावसकर यांची वडिलोपार्जित फळबागायत आहे. वडिलांच्या पश्‍चात मिलिंद हे स्वतः बागेचे व्यवस्थापन पाहत आहेत.

राजेश कळंबटे

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : नारळ- मसाला पिके

शेतकरी : मिलिंद मोहन पावसकर

गाव : पूर्णगड, जि. रत्नागिरी

एकूण नारळ झाडे : १०० झाडे

रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे मिलिंद मोहन पावसकर यांची वडिलोपार्जित फळबागायत आहे. वडिलांच्या पश्‍चात मिलिंद हे स्वतः बागेचे व्यवस्थापन पाहत आहेत. मिलिंद यांच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून नारळाच्या टीडीएफ, बाणवली या जातींची रोप आणून त्यांची लागवड केली होती.

संपूर्ण लागवड कातळावरील जमिनीत आहे. लागवड करताना फळझाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतली होती. त्यामुळे बागेत रोगराई तुलनेने कमी आहे. सुरुवातीपासूनच बागेत सेंद्रिय खतांचा अधिक वापर करण्यावर भर दिला आहे.

व्यवस्थापनातील बाबी

जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला की सेंद्रिय खतांच्या मात्रा नारळ झाडांना दिल्या जातात. एका झाडाला साधारण ४ ते ५ किलो प्रमाणे सेंद्रिय खत दिले जाते. दिलेली खतमात्रा पावसाच्या पाण्‍याद्वारे वाहून जाऊ नये यासाठी झाडाभोवती आळी केली जातात. त्यानंतर गांडूळ खत आणि शेणखत प्रति झाड ४ ते ५ किलो प्रमाणे दिले जाते.

ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस कमी होतो. त्या वेळी पुन्हा गांडूळखत दिली जाते. घरीच गांडूळ खत आणि शेणखत निर्मिती केली जाते. त्यामुळे खतांवरील खर्चात बचत होते.

खतमात्रा देताना नारळाच्या झाडाचा आकार आणि विस्तार विचारात घेतला जातो. त्यानुसार द्यावयाची मात्रा ठरविली जाते. मोठ्या विस्ताराच्या झाडांना १० ते १५ किलो खतमात्रा दिली जाते.

बागेत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सिंचनाची आवश्यकता भासत नाही. या काळात बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यासाठी चर काढले जातात. पाऊस थांबल्यानंतर एक दिवसाआड पाणी दिले जाते. एकदिवसा आड सकाळी एक तास याप्रमाणे मार्च महिन्यापर्यंत या प्रमाणे सिंचन केले जाते.

साधारण महिन्याभराच्या अंतराने मजुरांच्या मदतीने बागेतील तण काढून बागेची साफसफाई केली जाते.

वर्षभरात १३०० ते १५०० नारळ उत्पादन मिळते.

कीड-रोग व्यवस्थापन

गतवर्षी पहिल्यांदाच वातावरणातील बदलामुळे नारळावर कोळी किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे झावळावर डाग पडून ती खराब होतात. तसेच फळगळ होण्याची शक्यता होते. कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी घेतली. त्यामुळे पुढील संभाव्य नुकसान टाळणे शक्य झाल्याचे मिलिंद सांगतात.

बागेत मसाला पिकांची लागवड

नारळ बागेत दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र या मसाला पिकांची लागवड केली आहे. साधारणपणे ४० नारळावर काळी मिरी, तर दालचिनीच्या १० झाडांची लागवड आहे. त्यातून दरवर्षी काळी मिरीचे ५० ते ६० किलो, दालचिनी १० ते १२ किलो आणि तमालपत्राचे १५ किलो उत्पादन मिळते.

उत्पादित मसाला पिकांचा घरगुती वापरासाठी उपयोग केला जातो. तमालपत्राची साल सुकवून बाजारात विक्री केली जाते. नारळ बागेतील झाडांना खतमात्रा आणि सिंचन हेच मसाला पिकांसाठी देखील असते. त्यामुळे अन्य विशेष कामे मसाला पिकांसाठी करण्याची आवश्यकता भासत नसल्याचे मिलिंद सांगतात.

मिलिंद पावसकर ९६०७४४३०६३

(शब्दांकन : राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT