Betel Nut Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Nut Cultivation : हमखास उत्‍पन्नासाठी सुपारी लागवडीवर भर

Supari Farming : कोकणातील भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तर आंबा, काजू लागवडीतही निश्चित उत्पन्नाची शाश्‍वती नाही. त्‍यामुळे नुकसान न होणाऱ्या नारळ आणि सुपारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Team Agrowon

Alibaug Agriculture News : कोकणातील भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तर आंबा, काजू लागवडीतही निश्चित उत्पन्नाची शाश्‍वती नाही. त्‍यामुळे नुकसान न होणाऱ्या नारळ आणि सुपारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

कमी जागेत अनेक झाडे लावून दोन हंगामात पीक येत असल्‍याने सुपारीचे पीक रायगडमधील शेतकऱ्यांना मुख्य आधार ठरत आहे.

निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील सुपारीच्या बागांना मोठा तडाखा बसला. दोन वर्षे कृषी विभागाने सुपारी लागवडीवर भर दिल्यानंतर सुपारीच्या झाडांच्या संख्येत वाढ आहे. त्यातच दिवेआगरच्या रोठा सुपारीच्या झाडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

दिवेआगर परिसरात तयार होणाऱ्या रोठा सुपारीला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राचे या पिकाच्या संदर्भात संशोधन सुरू असते. या केंद्राकडून सुपारीच्या नवनव्या जातींचा शोध घेतला जात आहे.

या जाती कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत. सध्या गावठी सुपारीचा दर ४५० रुपये इतका वधारला आहे. सहकार तत्त्वावर चालणाऱ्या सुपारी संघाकडूनही सुपारीची खरेदी केली जाते. पाच वर्षांत सातत्याने दरवाढ होत असल्याने बागायतदारांनी सुपारी लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे.

रोठा सुपारीची ख्याती शेजारच्या बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्येही पसरली आहे. भारतात केरळ आणि कोकणात सुपारीचे उत्पादन घेतले जाते, हे उत्पादन मागणीपेक्षा कमी असल्याने सुपारीला दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याचे सुपारी बागायतदारांचे म्हणणे आहे.

सुपारी बागांवर औषध फवारणी केल्यास रोग प्रादुर्भाव कमी होतो. यावर संशोधन होत असल्याने सुपारी बागायतदारांना दिलासा मिळाला.

सुपारीच्या माडाला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने बागेतील अनावश्यक झाडे कमी करावी लागतात. पाण्याची मात्रा आणि वेळोवेळी औषधांची फवारणी केल्यावर कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळते.
संजय दांडेकर, बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT