Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : सोयाबीन उत्पादकांची आर्थिक कोंडी दूर करा

Soybean Rate : सोयाबीनला भाव नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली असून त्याची दखल घेत हमीभाव केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समिती सभापती रवींद्र ढोक यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे केली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : सण-उत्सवाचे दिवस तोंडावर आहेत. त्यामुळे उत्पादित शेतमालाच्या विक्रीची शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अशातच सोयाबीनला भाव नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली असून त्याची दखल घेत हमीभाव केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समिती सभापती रवींद्र ढोक यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाच्या हंगामात सुरुवातीला सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम होती. ऑगस्ट महिन्यापर्यंत पीकपरिस्थिती चांगली असताना त्यानंतरच्या काळात अति पाऊस झाला. परिणामी बुरशीजन्य रोग पिकावर वाढीस लागले. सोयाबीन पिवळे पडून करपले. त्यामुळे अनेक भागात उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होणार नाही, असे चित्र आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे पीक वाचले त्यांना एकरी उत्पादकता कमी मिळाली. आता सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विक्रीसाठी आणण्यावर भर दिला आहे. सोयाबीनला केंद्र सरकारने ४६०० रुपयांचा दर जाहीर केला असताना बाजारात अधिक ओलावा आणि काडी कचरा असल्याच्या कारणावरून कमी दर मिळत आहे.

शेतकऱ्यांची यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याने ती दूर करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यात तत्काळ हमी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभापती ढोक यांनी केली आहे. तत्काळ हमी केंद्र उघडल्यास सोयाबीन उत्पादकांना नोंदणी करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेत सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IIT Ropar Agri Ecosystem : शेतकऱ्यांसाठी देशातील पहिली कृषी बुद्धिमत्ता आधारित प्रणाली आयआयटी रोपड केली विकसित

Farm Road Dispute Resolved: शेतरस्त्याचा पिढ्यान्‌पिढ्यांचा वाद निकाली

Pre Monsoon Rain Impact: सिंधुदुर्गला पूर्वमोसमी पावसाचा दणका

Biodynamic Composting: २ महिन्यात तयार होणारे प्रभावी सेंद्रिय खत- बायोडायनॅमिक कंपोस्टिंग

Maharashtra Cabinet Decisions: भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग- १ मध्ये रुपांतरणाबाबत राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT