Soybean Market News : अकोल्यात सोयाबीनची ४७ हजार क्विंटल आवक

Soybean Production : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २८) सोयाबीनची विक्रमी साडे अकरा हजार क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्यात सोयाबीनने ४७ हजार क्विंटल आवकेचा टप्पा ओलांडला.
Soybean Market News
Soybean Market NewsAgrowon
Published on
Updated on

Akola News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २८) सोयाबीनची विक्रमी साडे अकरा हजार क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्यात सोयाबीनने ४७ हजार क्विंटल आवकेचा टप्पा ओलांडला. सरासरी दरात थोडी सुधारणासुद्धा दिसून आली.

येथील बाजार समित्यात योग्य दर मिळत असल्याने जिल्‍ह्यासह इतर भागांतूनही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक येथे सुरू आहे. सोयाबीनला येथे सरासरी दर ४६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

अकोला ही पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी दररोज विविध प्रकारच्या शेतीमालाची हजारो क्विंटलची आवक आणि उलाढाल होते. सध्या ही बाजार समिती सोयाबीनने फुललेली आहे.

Soybean Market News
Soybean Market : नगरला बाजार समितीत सोयाबीन, बाजरीची आवक सुरू

बाजार समितीत आठवडाभरात तब्बल ४७ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. सोयाबीनला किमान दर ४००० व कमाल दर ४८०० रुपये मिळत आहे. यंदाचा सोयाबीन हंगाम जोरावर आलेला आहे.

सर्वत्र सोयाबीनची सोंगणी, मळणी जोमाने सुरू आहे. मजुरांची मागणी वाढलेली असून काही भागांत हार्वेस्टरनेही मळणीला वेग आला आहे. सोयाबीन मळणीसाठी विविध राज्यांतून यंत्रे दाखल झाली आहेत.

Soybean Market News
Hinganghat Soybean Market : हिंगणघाट बाजार समितीत सोयाबीनची १० हजार क्‍विंटलवर आवक

खरेदीसाठी चढाओढ

येथील बाजार समितीत सोयाबीन खरेदीसाठी चढाओढ सुरू असल्याने येथील दरसुद्धा इतर बाजार समित्यांच्या तुलनेत चांगला आहे. यामुळे विविध भागांतील शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आपला माल येथील बाजारात घेऊन येत आहेत.

सोयाबीनची आवक वाढल्याने मध्यंतरी एक दिवस बाजारात सोयाबीनची आवक बंद ठेवावी लागली होती. आणखी काही दिवस ही आवक कायम राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

आठवडाभरातील आवक (क्विंटलमध्ये)

तारीख आवक

२८ ऑक्टोबर ११९६८

२७ ६८२९

२६ ६२१६

२५ ६१२८

२३ ५२७०

२२ ५८४२

२१ ५७१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com