Ravikant Tupkar  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Issue : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर निघणार बुलडाण्यात एल्गार मोर्चा

Ravikant Tupkar : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रमुख प्रश्‍नांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चाचे आयोजन करीत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Team Agrowon

Buldana News : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रमुख प्रश्‍नांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चाचे आयोजन करीत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. एल्गार यात्रेच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी स्थानिक विश्रामभवन परिसरात कार्यकर्त्यांची बैठक झाली.

तुपकर म्हणाले, की राज्यात सोयाबीनचा पेरा ५० लाख ८५ हजार ५८९ हेक्टरवर झाला आहे. तर कपाशीचे ४२ लाख ३४ हजार ४७३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी सोयाबीनचे अपेक्षित होणारे उत्पादन १०० लाख टन असून उत्पादनात ३० टक्के घट येणार असल्याचा अंदाज आहे.

देशाच्या सोयाबीन उत्पादनातील ४० टक्के सोयाबीन महाराष्ट्रात तयार होते. यंदा हे प्रमुख पीक आधी पावसाचा खंड, नंतर यलो मोझॅक, मूळ-खोड कुजीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. कापसाचेही ५० टक्के नुकसान झालेले आहे. यावर्षी पीकविमा कंपन्या नुकसान भरपाई देण्याच्या मानसिकतेत नाही. अग्रिम देण्यावरूनच सध्या चालढकल सुरू आहे.

गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला काढलेल्या एल्गार मोर्चानंतर मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन, यावर्षी फेब्रुवारीत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले. तुरुंगवास भोगला. या आंदोलनांमुळे शासनाने बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ९३९ शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे २२९ कोटी ९३ लाख ८ हजार ७७ रुपये जमा केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनानंतरच हा पीकविमा मिळाला. पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळण्याची मागणी लावून धरली होती. तीसुद्धा राज्य सरकारने मान्य करीत १५०० कोटी रुपये मंजूर केले. याशिवाय इतरही मदत मिळाली. भाववाढीच्या मुद्यावर केंद्र सरकारने फसवले. गुजरात व इतर राज्यांच्या निवडणुकीमुळे सोयाबीन, कापसाच्या भावात केंद्र सरकारने फसवले. राज्य सरकारने पाहिजे तसा पाठपुरावा केला नाही. फक्त पत्र पाठवले होते, हेही त्यांनी मान्य केले.

बुधवारपासून (ता. २५) सोमवारपर्यंत (ता. ३०) सोयाबीन, कापूस पट्ट्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांचा दौरा करीत ठिकठिकाणी एल्गार परिषदा घेत जनजागृती करणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. त्यानंतर १ ते २० नोव्हेंबरपर्यंत एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा पिंजून काढणार व २० नोव्हेंबरला एल्गार रथयात्रेचा समारोप होणार असून एल्गार महामोर्चा काढण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यंदाच्या लढ्याच्या मागण्या

- यलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी

- सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९००० रुपये व कापसाला प्रतिक्विंटल किमान १२,५०० रुपये भाव मिळावा.

- या वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे.

- जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात महापुराने झालेल्या नुकसानाची १०० टक्के भरपाई मिळावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT