Vidhan Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Legislative Council Oath Ceremony : विधान परिषदेच्या अकरा आमदारांनी घेतली शपथ

Oath Ceremony : विधान परिषदेवर निवडून आलेल्या ११ आमदारांना रविवारी (ता. २८) विधान भवनात शपथ देण्यात आली.

Team Agrowon

Mumbai News : विधान परिषदेवर निवडून आलेल्या ११ आमदारांना रविवारी (ता. २८) विधान भवनात शपथ देण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यवर्ती सभागृहात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली.

विधान परिषदेवर निवडून आलेल्या ११ आमदारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना शपथ देण्यात आली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आणि भावना गवळी व कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, योगेश टिळेकर यांचाही विजय झाल्याने त्यांना शपथ देण्यात आली. उपसभापती गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पंकजा मुंडे, सदाशिव खोत, परिणय फुके, अमित गोरखे, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर,

प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, राजेश टिळेकर आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना शपथ देण्यात आली. भाजपने सर्व्हे दाखवून तिकीट नाकारलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतर शिंदे गटात उत्साह संचारला आहे.

रविवारी शपथ घेतल्यानंतर गवळी यांनी ‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ अशी घोषणा देत कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Trade Agreement: मुक्त व्यापार करारात शेती, डेअरीला संरक्षण

Debt Relief Fund: कर्जमुक्तीसाठी केवळ ५०० कोटी

Citrus Pest Management: कीड, रोगांचे धोके वेळीच ओळखून व्यवस्थापन करा

Purandar Airport: पुरंदर विमानतळामुळे विकासाला प्रोत्साहन

Chandrapur Kidney Sale Case: सोलापुरातील रामकृष्णने विकल्या दहा किडन्या

SCROLL FOR NEXT