Loksabha Oath Ceremony : ‘जय संविधान’च्या घोषणांसह खासदारांनी घेतली शपथ

Oath of Lok Sabha Membership : महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी (ता. २४) जय संविधान, जय भीम, जय शिवरायच्या घोषणा देत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
MP Nagesh Ashtikar
MP Nagesh Ashtikar Agrowon
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी (ता. २४) जय संविधान, जय भीम, जय शिवरायच्या घोषणा देत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वडिलांना स्मरून शपथ घेत असल्याबद्दल हिंगोलीचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांना हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांनी चांगलीच समज दिली व पुन्हा शपथ घेण्यास भाग पाडले.

MP Nagesh Ashtikar
Indian Politics : नवी सुरुवात, नवे संकल्प

लोकसभा सभागृहाचे मंगळवारी कामकाज सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्रातील खासदारांची शपथ सुरू झाली. सोमवारी २६२ सदस्यांनी शपथ घेतली होती. पहिल्यांदा नंदूरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी हिंदीतून शपथ घेतली.

MP Nagesh Ashtikar
PM Modi Oath Ceremony : मोदींची हॅट्ट्रीक! तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

या वेळी त्यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेतली होती. यानंतर येणाऱ्या प्रत्येक सदस्याने जय संविधान, जय भीम, जय शिवराय, जय हिंद अशा घोषणा देत शपथ घेतली. महाराष्ट्रातील बहुतेक सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. परंतु काहींनी हिंदी व इंग्रजीतूनही शपथ घेतली.

मणिपूरवर सर्वाधिक टाळ्या

महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेच मणिपूरच्या दोन खासदारांनी शपथ घेतली. मणिपूरचे खासदार शपथ घ्यायला आल्याबरोबर काँग्रेससह सर्व विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या वेळी राहुल गांधी यांनी मणिपूरच्या खासदाराला राज्यघटनेची प्रत दिली व ती हातात घेऊन शपथ घेण्याचे सुचविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com