Human Development Index  Agrowon
ॲग्रो विशेष

Human Development Index : पाणलोट क्षेत्रातील पोषकतेचा ‘वयानुसार उंची गुणांक’

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Height for Age Coefficient : मानव विकास निर्देशांक तपासण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. त्यातील एक म्हणजे शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलांचे पोषण होय. पाणलोट क्षेत्राच्या विकास आणि पुढील योग्य व्यवस्थापनातून नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये बदल घडतात. मुबलक पाणी उपलब्धतेमुळे शेती व्यवस्थेत बदल घडून आर्थिकदृष्ट्या स्थिरता येते.

त्याचे फायदे मुलांमध्येही दिसून येतात. पाणलोट क्षेत्रातील मानवी विकास निर्देशांक (Human Development Index, HDI) मोजताना हा मुलांच्या ‘वयानुसार उंची गुणांक’ (हाइट फॉर एज कोइफिशंट, HAC)द्वारे मोजला जातो. म्हणून

Formula

म्हणजेच

h = मुलांची उंची सेंटिमीटर मध्ये, i = i निरीक्षण, j = j हा वर्ग आणि, fj= j या वर्गातील निरीक्षणांची एकूण संख्या (वारंवारिता).

या निर्देशांकाचे किंमत ० ते १ यादरम्यान कितीही येऊ शकते. जेवढी संख्या जास्त तेवढा वयानुसार उंची गुणांक जास्त व पर्यायाने मानव विकास निर्देशांक जास्त असा निष्कर्ष निघतो.

उदाहरण म्हणून पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांमुळे हिवरे बाजार येथील बदललेल्या नैसर्गिक व शेतीतील परिस्थितीमुळे तेथील मुलांच्या वय आणि वजनाच्या गुणोत्तरामध्ये झालेले बदल यांचा अभ्यास करू.

गेली ३५ वर्षे हिवरे बाजारमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन केले गेले. परिणामी, येथील शंभर टक्के कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. परिणामी, मुलांच्या संगोपनामध्ये त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. हा निर्देशांक अभ्यासण्यासाठी हिवरेबाजार येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीमधील प्रत्येकी २८ मुले, मुलींची निवड केली.

त्यांची जून २०२४ या महिन्यात वजन आणि उंची मोजण्यात आली. त्यांचे वय आठ ते नऊ वर्षे आहे. (तक्ते पाहा.) त्यावरून वरील सुत्राचा वापर करून मानव विकास निर्देशांक (वयानुसार उंचीचा गुणांक) काढला. तो ०.९३ आणि ०.९४ आला. तो एकच्या जवळ आला म्हणजेच ही मुले प्रमाणित निकषांशी तुलना केली असता ही मुले सदृढतेच्या जवळ आहेत.

भारतीय मुलांचे पोषण आणि सद्यःस्थिती

जागतिक भूक निर्देशांकामध्ये १२५ देशांमध्ये भारत १०७ व्या क्रमांकावर आहे. मुलांचे कुपोषण हे चार घटकांशी निगडित आहे. प्राथमिक घटक म्हणजे कमी पोषण हाच आहे. यानंतर वेस्टिंग (उंचीच्या प्रमाणात कमी वजन), स्टंटिंग (वयाच्या प्रमाणात कमी वजन) हे घटक मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम करतात.

मात्र या दोन्ही घटकांसाठी स्वच्छता, आनुवंशिकता, आजूबाजूचे पर्यावरण आणि आणि सेवन करत असलेले अन्न अशा वेगवेगळ्या बाबी कारणीभूत ठरतात. यामध्ये चौथा घटक म्हणजे बालमृत्यू. त्यासाठी तर कमी पोषण (कुपोषण) हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्रालयाचा १५ मार्च २०२३ चा अहवाल सांगतो.

भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (२०१९ ते २१) अहवालात भारतातील पाच वर्षांपर्यंत मुलांची आरोग्य स्थिती सुधारल्याचे नमूद केले आहे. २०१५- १६ च्या तुलनेमध्ये ‘स्टंटिंग’चे प्रमाण ३८.४ टक्क्यांवरून ३५.५ टक्क्यांपर्यंत कमी झाले, तर ‘वेस्टिंग’चे प्रमाण २१ टक्क्यांवरून १९.३ टक्क्यांपर्यंत आले आहे.

कमी वजनांच्या मुलांचे प्रमाण ३५.८ टक्क्यांवरून ३२.१ टक्के झाले आहे. थोडी सुधारणा असली तरी समाधानकारक नक्कीच नाही. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने ‘पोषण अभियान २.०’ सुरू केले होते. त्यात कुपोषित मुले, वयात येणाऱ्या मुली, गर्भवती स्त्री आणि स्तनदा माता यांचे आरोग्य पोषण, सुदृढता व शारीरिक क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

पाणलोट विकासाच्या सामाईक मार्गदर्शक सूचना, २००८ मध्येही अवर्षणप्रवण क्षेत्रातील कुपोषण, दारिद्र्य, पाण्याची टंचाई या सामाजिक समस्या कायमस्वरूपी मिटवून गावाच्या शाश्‍वत विकासाचे उद्दिष्ट ठेवले होते. यशाच्या या उद्दिष्टांवर आपण किती खरे उतरलो आहोत, हा संशोधनाचा विषय आहे.

योग्य नेतृत्व आणि लोक सहभाग यामुळे हिवरेबाजारसारखी काही मोजकीच गावे सक्षमपणे उभी असल्याचे दिसते. पाणलोट विकासातून नैसर्गिक संपत्ती व शेतीतही पारंपारिक पीक पद्धती टिकवत गावातील कुटुंबाचे व पुढील पिढ्यांचे पोषण करण्यात हिवरेबाजारला यश आले आहे. केंद्र व राज्य शासनासह अन्य गावांनीही यातून बोध घेण्याची गरज आहे.

चांगल्या योजनांचा पाठपुरावा करतो का?

भारताचा सर्वांगीण विकास नव्या पिढीवरच अवलंबून आहे. आपल्या खेड्यापाड्यातील नवीन पिढी जन्मापासून सुदृढ राहण्यासाठी हिवरेबाजार प्रमाणेच नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.

२०१४ मध्ये लाल किल्ल्यावरून नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी निवडून आलेल्या प्रत्येक खासदारांना आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते.

त्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेचे आव्हाने किती खासदारांनी पेलले हे अनुत्तरितच आहे. त्यानंतर २०१९ मध्ये आणि आता २०२४ मध्ये निवडून आलेले खासदार त्याकडे किती गांभीर्याने पाहतात, हाही प्रश्‍नच आहे. या योजनेतून देशातील किमान दीड हजारापेक्षा अधिक खेडी विकासाच्या वाटेवर पुढील पायरीवर पोहोचली असती. लोकशाहीमध्ये समाज लवकर विसरून जातो. पण ज्यांनी ती योजना आणली, त्यांनी तरी त्याचा पाठपुरावा केला का, हाही प्रश्‍नच आहे.

तक्ता क्रमांक १ : मानव विकास निर्देशांकासाठी इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुले मुलांची मोजलेली उंची.

अ.क्र. इयत्ता तिसरी इयत्ता चौथी

मुले उंची (सेंमी) मुली उंची (सेंमी) मुले उंची (सेंमी) मुली उंची (सेंमी)

१ तन्मय १२४ आर्या १२४ विराज १२१ आर्या १२२

२ श्रेयस ११७ भाग्यश्री ११६ सोहम १२२ श्रावणी ११८

३ आयुष्य १३२ आस्था ११७ शेखर १२४ आदिती १३३

४ शौर्य ११४ अधिरा १२८ समर्थ १२१ गौरी ११७

५ उदयनराजे ११६ चैताली ११४ आराध्य १२६ आरोही १२०

६ चैतन्य ११८ श्रेया १२१ भावेश १२४ श्रावणी १३१

७ ज्ञानदीप ११७ श्रावणी ११९ साईराज १२७ प्रांजल १३२

८ प्रणव १२६ वेदश्री ११० दर्शन १२२ प्रणाली १२३

९ प्रतीक ११७ आर्वी ११९ श्रेयश ११२ अनुष्का ११५

१० संग्राम १११ स्वरा १०६ प्रसन्न १२१ गुंजन ११८

११ प्रज्वल १११ श्रावणी ११३ साईराज १२४ आरोही ११८

१२ प्रेम १३३ हर्षदा १२७ संग्राम १२२ अनुजा ११६

१३ शिवम १२६ आराध्या १०७ ओम १२५ भक्ती १३३

१४ ओंकार ११८ आराध्या ११४ रियाज १२७ ईशानी १३३

सरासरी १२० सरासरी ११७ १२३ १२४

तक्ता २ : मुलींचा मानव विकास निर्देशांक

वर्ग बेरीज (hij) वारंवारता (fj) प्रमाणित (hj)

J=१ ( तिसरी) १६३५ १४ १२६.४

J=२ (चौथी) १७२९ १४ १३२.२

तक्ता ३ : मुलांचा मानव विकास निर्देशांक

वर्ग बेरीज (hij) वारंवारता (fj) प्रमाणित (hj)

J=१ ( तिसरी) १६८० १४ १२७

J=२ (चौथी) १७१८ १४ १३२.२

Chart 2 and 3

या निर्देशांकाच्या अभ्यासासाठी हिवरे बाजारमधील इयत्ता तिसरी मधील १४ मुले व १४ मुली आणि इयत्ता चौथीमधील १४ मुले व १४ मुली यांची उंची मोजण्यात आली व त्याचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यानंतर किंमत मुलींसाठी ०.९३ इतकी येते, तर मुलांसाठी हीच किंमत ०.९४ इतकी येते.

म्हणजेच भारतीय आरोग्य संघटना यांनी शिफारस केलेल्या सरासरी बरोबर तुलना केली असता हिवरे बाजार मधील सशक्त व सुदृढ असल्याचे पुढे आले. याचाच अर्थ, पाणलोट क्षेत्र विकासातून केवळ आपले जीवन सुधारते असे नव्हे, तर भविष्यातील पिढ्याही सुदृढतेकडे वाटचाल करू लागतात.

(या लेखासाठी हिवरेबाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दीपक पवार, बाबा जाधव यांची मोलाची मदत झाली आहे.)

- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT