Electricity Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : तीन महिन्यांत परिमंडळात ६९३ वीजचोरीचे प्रकार

Latur Power Theft : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात एप्रिल, मे व जून या महिन्यांत लातूर परिमंडलातील तीनही जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली.

Team Agrowon

Latur News : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात एप्रिल, मे व जून या महिन्यांत लातूर परिमंडलातील तीनही जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. यात ६९३ वीजचोरीचे प्रकार उघड झाले. कारवाईत आकडे टाकून वापरण्यात आलेल्या शेगड्या, हीटर व केबल जप्त करण्यात आले असून ७१ लाखांची वीजचोरी सापडली आहे.

नियमित वीजबिल भरणाऱ्या वीजग्राहकांना अखंडित व योग्यदाबाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत तसेच धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांत धडक मोहीम हाती घेतली असून जास्त लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या व मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरून वापरणाऱ्या विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व उपविभागांना निर्देश दिले आहेत.

त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत राबविलेल्या धडक कारवाईत संशयास्पद अशा वीजग्राहकांची तपासणी केली असता ६९३ ग्राहक विविध मार्गाने वीजचोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तब्बल ७१ लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी झालेली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३२३ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले.

तर बीड जिल्ह्यातील २०६ वीजग्राहक तसेच धाराशिव जिल्ह्यातील १६४ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यासर्व वीजचोरांवरती वीजकायदा २००३ अनुसार कलम १३५ व १२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून वीजचोरीच्या बिलाची व दंडाची बिले तयार करून देण्याची कारवाई सुरू असून, दिलेली बिले न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या धडक कारवाईत विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

वीजगळती कमी करण्याच्या दृष्टीने वीजचोरी विरोधात धडक मोहीम सातत्याने यापुढेही राबविली जाणार आहे. वीजचोरी करणे हा दंडात्मक गुन्हा असून महावितरण मागेल त्याला वीजपुरवठा देण्यास बांधील आहे. नागरिकांनी अधिकृतरीत्याच वीज वापरावी.
- अरविंद बुलबूले, मुख्य अभियंता लातूर परिमंडल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक

Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य

India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना

Potato Farming Losses: खर्च ५८ हजार अन् उत्पन्न अवघे २७ हजार

River Conservation: नदीचे आक्रंदन जाणणाऱ्या शैलजा

SCROLL FOR NEXT