Commissioner of Central Election Commission Rajiv Kumar Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election 2024 : दिवाळी, अन्य सणांचा विचार करून निवडणुका

Team Agrowon

Mumbai News : दिवाळी आणि अन्य सणांचा विचार करून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची विनंती राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे या सूचनांचा विचार करून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.

‘आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान’ असे घोषवाक्य घेऊन आम्ही निवडणूक प्रक्रिया राबवू असेही ते म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर शनिवारी हॉटेल ट्रायडंट येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी राजीवकुमार म्हणाले, ‘‘या दौऱ्यात आम्ही ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली.

या वेळी सर्वच पक्षांनी विविध सूचना केल्या आहेत. त्याबरोबरच आम्ही पोलिस महासंचालक, आयुक्तांसोबतही चर्चा केल्या आहेत. बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप या पक्षांशी आम्ही चर्चा केली. या पक्षांनी दिवाळी, छटपूजा आणि अन्य सणांचा विचार करून निवडणुकीची घोषणा करण्याची विनंती केली.

तसेच सलग सुट्ट्या असताना निवडणूक घेऊ नये, आठवड्याच्या मध्यावर निवडणूक घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. त्यामुळे या सूचनांचा आम्ही विचार करू. लोकसभा निवडणुकीत शहरी भागात अनेक ठिकाणी गैरसोयी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे या निवडणुकीत मूलभूत सोयी-सुविधा देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात येईल. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय केली जाईल. तसेच १०० वर्षांवरील ४९ हजार मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाईल. राजकीय पक्षांनी पोलिंग एजंट स्थानिक असावा, फेक न्यूजचा प्रचार थांबवावा,’’ अशी विनंती केली आहे.

अधिकारी बदल्या आणि पैशांच्या गैरवापराबाबत तक्रारी

राज्यात अनेक ठिकाणी तीन वर्षांपेक्षा ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच पैशांचा गैरवापराबाबतही निवेदने दिली आहेत. दारू, पैसा, ड्रग्ज, गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी ३०० हून अधिक तपासणी नाके उभारण्यात येतील. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे, असेही आयुक्त राजीवकुमार म्हणाले.

राज्यातील मतदार संघ २८८

विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर

मतदान केंद्रे १ लाख १८६

मतदार ९ कोटी ५९ लाख

पुरुष मतदार ४ कोटी ५९ लाख

महिला मतदार ४ कोटी ६४ लाख

दिव्यांग मतदार ६ लाख ३ हजार

१०० वर्षांवरील मतदार ४९ हजार

प्रथम मतदार १९ लाख ४८ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहण्याची शक्यता

Grape Pruning : जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

SCROLL FOR NEXT