Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Election Update : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक २०२४ कायदा व संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते.
Assembly Elections
Assembly Elections Agrowon
Published on
Updated on

Solapur News : विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक २०२४ कायदा व संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपयुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Assembly Elections
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, पोलिस विभागाने लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोखपणे राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅश किंवा दारू जप्त करण्यात आली होती अशा ठिकाणी पोलिस विभागाने सुरक्षा अधिक चोख ठेवावी. तसेच वलनेरब्ल व क्रिटिकल मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असेही त्यांनी सूचित केले.

Assembly Elections
One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजूरी, आता एकाच वेळी लागणार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका

यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलिस प्रशासनाने नियोजन केलेले असून सर्व क्रिटिकल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिस दल तयार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी दिली.

पोलिस अधिकाऱ्यांना उद्या प्रशिक्षण

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच वलनरेबल व क्रिटिकल मतदान केंद्राच्या अनुषंगाने सर्व पोलिस अधिकारी, सेक्टर ऑफिसर यांचे प्रशिक्षण उद्या २१ सप्टेंबर २०२४ रोजी ठेवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com