Sangli APMC Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Market Committee Update : सांगली बाजार समिती सभापती निवड २५ मे रोजी

Sangli Market Committee Election : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सभापती व उपसभापतींची निवड २५ मे रोजी होत आहे.

Team Agrowon

Sangli APMC News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सभापती व उपसभापतींची निवड २५ मे रोजी होत आहे. पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जाहीर केला. दोन्ही पदांच्या निवडी एकाच दिवशी होणार आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीतील राजकीय हालचाली वाढणार असून सभापती, उपसभापतिपदासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली जात आहे.

सांगली बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान झाले, २९ एप्रिलला मतमोजणी झाली. निवडणुकीत महाविकास आघाडीला एकहाती सत्ता मिळाली. निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व माजी मंत्री अजितराव घोरपडे अशी एकत्रित महाविकास आघाडी सत्तेत आली.

आघाडीला १८ पैकी १६ जागा मिळाल्या. हमाल तोलाईदार गटातून निवडून आलेले संचालक मारुती बंडगर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. निवडून आलेल्या १५ पैकी काँग्रेसचे सर्वाधिक सात, राष्ट्रवादी ६ आणि घोरपडे गटाच्या २ संचालकांचा समावेश आहे.

निवडणुकीनंतर सभापती व उपसभापतीची निवड कधी होणार याकडे लक्ष होते. जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.

सभापती व उपसभापतिपदाच्या निवडी २५ मे रोजी होतील. दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. पदाधिकारी निवडीसाठी उपस्थित राहण्याबाबत सोमवारी संचालकांना नोटीस काढण्यात आली. सभापती व उपसभापती निवडीसाठी महाविकास आघाडीत हालचाली वाढल्या आहेत.

ही नावे आहेत चर्चेत

सभापतिपदासाठी काँग्रेससमधून जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गटाचे सुजय शिंदे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मिरज तालुक्यास प्रथम सभापतिपद देण्याचा निर्णय झाल्यास दादा घराण्यातील संग्राम पाटील व ऐनवेळी उमेदवारी मिळवून यशस्वी झालेले एरंडोलीचे बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी सभापतिपदासाठी आग्रही नाही. त्यामुळे घोरपडे गटाला उपसभापतिपदाची संधी मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT