Sangli Market Committee : सांगली बाजार समितीचे लेखापरीक्षण तातडीने करा

Sangli Agriculture Produce Market Committee : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे २०२०-२१ व २०२१-२२ चे लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करून घ्यावे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli Apmc Election : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे २०२०-२१ व २०२१-२२ चे लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांना पणन संचालक विनायक कोकरे यांनी दिले आहेत. बाजार समितीचे लेखापरीक्षण विहित कालावधीत पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे काही वैधानिक, न्यायालयीन बाब उद्‍भवल्यास त्याची जबाबदारी आपली राहील, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. बाजार समितीच्या चौकशीचे अहवालही सादर केले नसल्याचे कळविले आहे.

स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी बाजार समितीच्या लेखा परीक्षणाची पणन संचालकांना ४ मे २०२३ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन पणन संचालकांनी जिल्हा सहकार उपनिबंधकांना तातडीने आदेश काढला आहे.

आदेशात म्हटले आहे, की श्री. फराटे यांनी सांगली बाजार समितीचे २०२०-२१ व २०२१-२२ चे लेखापरीक्षण अपूर्ण असल्याबाबत तक्रार केली आहे.

Sangli APMC Election News
Pune APMC Latest News : पुणे बाजार समितीच्या सभापतिपदी दिलीप काळभोर

त्यानुसार बाजार समितीमध्ये अनेक आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार झाले असून, हा आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार जाणीवपूर्वक दडपण्यासाठीच या कालावधीतील लेखापरीक्षण प्रलंबित ठेवले जात आहे, असे स्वतंत्र भारत पक्षाने म्हटले.

बाजार समितीचे लेखापरीक्षण विनाविलंब पूर्ण होईल, याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात. आपण बाजार समितीचे ‘नियंत्रक अधिकारी’ असल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. अहवाल सादर करावा, असे आदेश कोकरे यांनी दिले.

लेखापरीक्षकांची नेमणूक

बाजार समितीचे २०२०-२१ चे लेखापरीक्षण करण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये संजय पाटील (विशेष लेखा परीक्षक वर्ग-१) यांची नेमणूक केली होती. तथापि, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांच्या पत्रान्वये लेखापरीक्षणासाठी अमृतराव माने यांची नेमणूक केली होती. ती रद्द करून त्यानंतर डी. पी. देसाई यांची नेमणूक केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com