Local Body Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Local Body Elections: सोलापूर जिल्ह्यातील तयारीची माहिती निवडणूक आयोगाला सादर

Election Commission: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढण्यासाठी नियोजन करा, मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा द्या, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या आहेत

Team Agrowon

Solapur News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढण्यासाठी नियोजन करा, मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा द्या, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या आहेत. पुणे विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक गुरुवारी पुण्यात झाली.

या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या तयारीची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सादर केली. सध्या जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त लवकरच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहेत.

महापालिकेची व नगरपरिषदांची प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप प्रभागरचनेसाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देण्यात आली. मतदान केंद्रावर मतदारांना द्यायच्या सुविधा, पारदर्शक व लोकशाही पद्धतीने निवडणूका पार पाडण्यासाठी आवश्‍यक असलेली खबरदारी याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी हेदेखील या आढावा बैठकीला उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गट, गण व प्रभागाच्या आरक्षण सोडतीबाबत अद्यापपर्यंत आयोगाने सूचना दिलेल्या नाहीत. या प्रक्रियेकडे इच्छुकांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT