Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सूक्ष्मनियोजन करा

State Election Commissioner Dinesh Waghmare: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आदींबाबत सूक्ष्मरीतीने पूर्वनियोजन करा.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आदींबाबत सूक्ष्मरीतीने पूर्वनियोजन करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात श्री. वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. ७) आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

Election
Local Body Elections: आता दिवाळीनंतरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोग

श्री. वाघमारे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६५० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे.

मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढीसाठी मदत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असली तरी मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निकषाद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रीकरण करता येईल.

Election
Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोईसुविधा देण्याबाबत दक्षता घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यांनी मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी. राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करून दि

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, मतदार यादी विभाजनाच्या नियोजनाची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यापूर्वी मॉक पोल घ्यावा, खासगी जागेतील केंद्रांच्या याद्यांना पूर्वप्रसिद्धी द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com