Saharad Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय

NCP Leader Sharad Pawar : शरद पवार यांची सप्टेंबर २०२२ मध्ये अध्यक्षपदी झालेली निवडच रद्दबातल ठरविण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Sharad Pawar VS Ajit Pawar : शिवसेना कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. यावर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल असा धक्कादायक निकाल दिला होता. दरम्यान निवडणूक आयोगाने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची नसून अजित पवार यांची असल्याचा १४१ पानांचा निर्णय जाहीर केला आहे.

तसेच शरद पवार यांची सप्टेंबर २०२२ मध्ये अध्यक्षपदी झालेली निवडच रद्दबातल ठरविण्यात आली आहे. १० व ११ सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाअधिवेशन झाले होते. या अधिवेशनात एकमताने शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. परंतु, निवडणूक आयोगाने ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेप्रमाणे झाली नसून या महाअधिवेशनाला उपस्थित असलेल्या लोकांचा कोणताही सबळ पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला आता स्वतःसाठी पक्षाचे वेगळे नाव सुचवावे लागेल. यासाठी त्यांना तीन नावांचे पर्याय देण्यात आले आहेत. सादरीकरणासाठी आयोगाने त्यांना आज (ता. ७) दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शरद पवार गटाने चालविली आहे.

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवडही आयोगाने रद्दबातल ठरविताना यापुढे त्यांना कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी २ जुलैला अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतली होती, यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट दोन उभे गट पडले होते.

अजित पवारांचा दावा योग्य

आयोगाने म्हटले आहे की, ३० जून २०२३ रोजी अर्जदार अजित पवार यांच्याकडून निवेदन मिळाले असून त्यात त्यांनी शरद पवार हे अध्यक्ष म्हणून बेकायदापणे पक्ष चालवीत असल्याचे म्हटले आहे. याउलट अजित पवार गटाकडे लोकप्रतिनिधी तसेच पक्षाच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे पाठवळ असल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरील दावा घटनेतील तरतुदीला अनुसरून आहे.

जयंत पाटील यांची निवड रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती केली होती. प्रदेशाध्यक्षाची निवड ही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीने व्हायला पाहिजे. यामुळे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेले सर्व निर्णय व नियुक्त्या या रद्दबातल ठरलेल्या आहेत. तसेच त्यांची निवडही रद्द करण्यात आली आहे.

सुळे, पटेल यांची निवडही रद्द

प्रतिवादी शरद पवार यांनी दोन कार्यकारी अध्यक्षांची निवड केली होती. पक्षाच्या घटनेत या प्रकारची नियुक्ती करण्याची कोणतीही तरतूद नाही. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. ही नियुक्तीही आयोगाने रद्द केली.

या निकालाचा आधार हा निर्णय देताना आयोगाने निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप ) कायदा- १९६८ नुसार तसेच सादिक अली विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग व सुभाष देसाई विरुद्ध प्रधान सचिव, राज्यपाल, मुंबई यांच्या निकालाचा आधार घेतला आहे. ही निवड ग्राह्य अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने १० जुलै २०२३ रोजी दिलेल्या सूचनेनुसार, ५ जुलैला झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली असल्याचे म्हटले होते. प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून तर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही निवड आयोगाने ग्राह्य मानली आहे.

आयोगाने बहुमताच्या आधारावर हा निकाल दिला आहे. आम्ही जे मुद्दे मांडले त्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिळून 'एनडीए'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. आज कायद्याने त्याला वैधता मिळाली. - खा. सुनील तटकरे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमच्यासाठी हा निर्णय आश्चर्यकारक नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत ६६ झाले तेच आमच्याबाबतीत घडले आहे.

आमदारांच्या संख्येवरून पक्षाचा ताबा ठरत नाही. या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. शरद पवार पुन्हा नव्या उमेदीने पक्ष उभा करतील. अदृश्य शक्तीने हा पक्ष पवार साहेबांच्या ताब्यातून ओरबाडून घेण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना ही शरद पवार यांच्या पाठीमागे उभी आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेण्याचा हा देशातील पहिलाच प्रकार आहे. - खा. सुप्रिया सुळे, शरद पवार गट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT