Mumbai News : ऊस आणि साखर क्षेत्राशी संबधित असलेल्या पाच उपक्रमांसाठी दरवर्षी प्रति टन ठरावीक रक्कम कापून सुमारे १८८ कोटी रूपयांचा निधी गोळा केला जातो. या रकमेचा विनियोग कसा होतो याबाबत अनभिज्ञता आहे. तसेच इतर कोणत्याही उद्योगाकडून असा निधी वसूल केला जात नसताना शेतकरी आणि साखर उद्योगाकडून का वसुली केली जाते, असा प्रश्न साखर कारखानदारांनी उपस्थित केला आहे. .दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघासोबतच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) आधी कपातीला विरोध केला होता; मात्र अलीकडेच या संघटनेने माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मदत निधी भरण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे..Sugar Industry: साखर कारखान्यांची यांत्रिक कामेही ‘एआय’ सांभाळणार.दरवर्षी १८८ कोटी ३३ लाख रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडून होत असते. यंदा ही वसुली ८२ कोटी १६ लाख रुपये झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, साखर संकुल देखभाल निधी आणि गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळासाठी प्रतिटन ठरावीक रक्कम कापून घेण्यात येते. यामध्ये सर्वाधिक १० रुपयांची कपात ही गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळासाठी केली जाते. यंदाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच रुपयांऐवजी १५ रुपये कपात करण्यास मान्यता दिली आहे..राज्यातील आठ ते दहा लाख ऊस तोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली. मात्र या महामंडळासाठी सरकारने निधी न देता शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वापरण्याची शक्कल लढविली. कामगारांच्या पाल्यांना सामाजिक, आर्थिक स्थैर्य, तसेच आरोग्य व शैक्षणिक सोयी सुविधांसाठी निधी उभारण्यात येतो. या महामहामंडळासाठी १० रुपये प्रति टन कपात करताना एफआरपीमध्ये कोणतीही कपात न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही रक्कम हंगाम संपल्यानंतर तातडीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..Sugar Industry Crisis: कपात, काटामारी अन् कारखाने.विरोध का?ज्या संस्थांसाठी कपात केली जाते त्या शेतकऱ्यांसाठी नेमके काय काम करतात, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे काम पोहोचते का, जर पोहोचत नसेल तर राजकीय नेत्यांची आणि साखर कारखानदारांची कार्यालये शेतकऱ्यांच्या पैशांतून का चालवायची का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कामगार कल्याण महामंडळासाठी शेतकऱ्यांचे पैसे वापरायचे आणि ऊस तोडीवेळी याच शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घ्यायचे असतील तर ही कपात कितपत योग्य आहे, असा प्रश्न अनेक कारखानदारांनी उपस्थित केला आहे..साखर संकुल देखभाल निधी व गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंहळ निधी कपातीला साखर संघ आणि विस्माने विरोध केला होता मात्र, विस्माने आता माघार घेत पूरग्रस्तांसाठीच्या निधीसाठी प्रति टन पाच रुपये तातडीने भरण्याची तयारी दाखविली आहे, तर साखर संकुल देखभाल व दुरुस्ती निधी प्रति टन ०.५० पैसे नुसार अगोदरच भरणा केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत गाळप परवाना अर्जासमवेत मागील हंगामानुसार प्रति टन पाच रुपयांचा भरणाही केला आहे. पण उर्वरित पाच रुपयांचा भरणा करण्यास ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ मिळावी. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळासाठी प्रति टन तीन रुपयांचा निधी अगोदरच भरला आहे, उर्वरित सात रुपये भरण्यास मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबत साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही..यंदा झालेली वसुली (रक्कम कोटींत)संस्था प्रतिटन वसुली अपेक्षित प्रत्यक्ष वसुलीमुख्यमंत्रीसहायता निधी ५ रुपये ५२. ८१ ५२.६५वसंतदादासाखर संस्था १ रुपया १०. ७६ ४.९७साखर संघ १ रुपया १०. ७६ ३.२७साखर संकुल देखभाल निधी ५० पैसे ५. ३८ ५.२४गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ १० रुपये १०७. ६३ १६.०३.या कपातीला आमचा प्रथमपासून विरोध आहे. या पैशांचे काय केले जाते याचा हिशेब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. साखर संघाचा आणि आमचा काही संबंध नाही. आमचेच पैसे घेऊन शेतकऱ्यांविरोधात साखर संघ न्यायालयात याचिका दाखल करते. त्यांना पैसे का द्यायचे, असा आमचा सवाल आहे.राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.