Maharashtra Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : आजपासून प्रचाराची रणधुमाळी

Election Campaign : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा शुक्रवारपासून (ता. ८) राज्यात प्रचार सभा घेणार असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा बुधवारपासून (ता. १३) प्रचार संपेपर्यंत होणार आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा शुक्रवारपासून (ता. ८) राज्यात प्रचार सभा घेणार असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा बुधवारपासून (ता. १३) प्रचार संपेपर्यंत होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (ता. ८) धुळे आणि नाशिकला जाहीर सभा होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत नारळ फुटणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून काँग्रेसने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली आहे. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ रोजी तर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी १३, १६ व १७ रोजी प्रचार सभा घेणार आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी सांगितले.

निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ११ सभा होणार आहेत. शुक्रवारी धुळे आणि नाशिक, शनिवारी (ता. ९) अकोला आणि नांदेड, मंगळवारी (ता. १२) चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे, गुरुवारी (ता. १४) छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत त्यांच्या सभा होणार आहेत. तर गृहमंत्री अमित शहा २० सभा घेणार असून त्यांची पहिली सभा शुक्रवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता शिराळ्यातील विश्वासराव नाईक कॉलेज मैदानात होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT