Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election 2024 : आंबेओहळ धरणग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार

Election Boycott : शासनाकडून पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याने आंबेओहळ धरणग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : शासनाकडून पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याने आंबेओहळ धरणग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसह यापुढील कोणत्याही निवडणुकीत धरणग्रस्त मतदान करणार नाहीत. बैठकीत तसा सामूहिक निर्णय घेतला आहे. आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे याबाबतचे निवेदन दिले आहे.

आंबेओहळ प्रकल्पाला २००० मध्ये प्रारंभ झाला. कायद्याने पुनर्वसन व्हावे म्हणून सुरुवातीला धरणग्रस्तांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सध्या धरणात पाणीसाठा केला जात असतानाही अद्याप धरणग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसन झालेले नाही.

एकही गुंठा जमीन न मिळालेले १००, अर्धे पुनर्वसन झालेले ५० तर भूखंड न मिळालेले ३० हून अधिक शेतकरी आहेत. संकलन दुरुस्ती न झालेले काही शेतकरी आहेत. लोकप्रतिनिधी, अधिकारी धरणग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत नाहीत.

गेल्या २३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारे धरणग्रस्त शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांनी यापुढील कोणत्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा हक्क आहे; पण अन्य पर्यायच नसल्याने हा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी निवेदन स्वीकारले. आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांच्यासह धरणग्रस्तांनी निवेदन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT