Election Expenditure Agrowon
ॲग्रो विशेष

Election Expenditure : खर्च सादर न केल्यास सहा वर्षे निवडणूक बंदी

Election Ban : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा व शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघात ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Team Agrowon

Dhule News : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील विजयी व पराभूत अशा सर्वच उमेदवारांनी निवडणूक काळात प्रचारावर केलेल्या खर्चाचा सर्व हिशेब २३ डिसेंबर २०२४ पर्यंत आपापल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.

जे उमेदवार खर्चाचा हिशेब देणार नाहीत, अशांवर पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्याचा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा व शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघात ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील अर्थातच ५१ उमेदवारांचा पराभव झाला.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. २० नोव्हेंबरला मतदान झाले तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. त्यामुळे २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.

विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सूचना त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जे उमेदवार मुदतीत खर्चाचा हिशेब सादर करणार नाहीत, त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या आकडेवारीची निवडणूक निरीक्षकांकडून तपासणी केली जाईल.

दुसरीकडे, यापूर्वी उमेदवारांच्या खर्चाची तीनवेळा तपासणी झाली. त्यात काही त्रुटी आढळल्या होत्या. त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आली होती. काहींनी त्रुटी पूर्ण केल्या आहेत, तर काहींनी अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke Demands: अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात नीलेश लंकेंचे आंदोलन

Sugarcane Crushing Update: सातारा जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Animal Crematorium: पशूंच्या स्मशानभूमीचा शासननिर्णय कागदावरच!

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या एक हजार जादा बसेसची व्यवस्था- मंत्री प्रताप सरनाईक

Crop Damage Compensation: पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT