Election on Ballot Paper : बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मार्कडवाडीला प्रशासनाचा दे धक्का!, जमावबंदीचा आदेश लागू

Markadwadi Voting News : माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला होता. पण आता येथे प्रशासनाने जमावबंदी लागू करत आक्षेप घेतला आहे.
Markadwadi Voting
Markadwadi VotingAgrowon
Published on
Updated on

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव केला होता. पण आता ग्रामस्थांच्या निर्णयावर प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करत पाणी फेरले आहे. उद्या (ता. ३) होणाऱ्या बॅलेट पेपरवर निवडणुकीवर आक्षेप घेत मतदानाची प्रक्रिया राबल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. हा इशारा माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी आदेश जारी करत दिला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत उत्तम जानकर यांना गावातून केवळ ८४३ मते मिळाली होती. तर विरोधक बाजप उमेदवार राम सातपुते यांना १००३ मते मिळाली होती. याआधी तीन निवडणुकीत जानकर यांना मताधिक्य मिळाले होते.

Markadwadi Voting
Voting on ballot paper : राम सातपुतेंना मिळालेली मते अमान्य; मारकडवाडी ग्रामस्थांचा बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा ठराव

पण यंदा सातपुते यांना जास्त लिड मिळाले जे शक्य नव्हते. याच मिळालेल्या लिडवरून ग्रामस्थांनी आक्षेप घेत पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी मतदान ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचे ठरवले होते. यासाठी बॅलेट पेपर छपाईसाठी देण्यात आले होते. तर निवडणूक अधिकारी म्हणून दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले होते.

दरम्यान मार्कडवाडी गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केला आहे. मार्कडवाडीत आज सोमवारपासून ते ५ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू असेल. याबाबत उपविभागीय अधिकारी पांगरकर यांनी जारी करताना, भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ नुसार जमावबंदी आदेश लागू केल्याचे सांगितले आहे.

Markadwadi Voting
Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

तसेच मार्कडवाडी ग्रामस्थांच्या भूमीकेवर आक्षेप घेताना, निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणेला अशा पद्धतीने मतदान घेता येत नाही, असे स्पष्टीकरण पांगरकर यांनी दिले आहे. तर मंगळावारी आयोजित मतदानाची प्रक्रिया थांबवावी. मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या त्या ग्रामस्थांवर कारवाई करू, ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मार्कडवाडी बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ नये, जमावबंदी आदेश कोणी तोडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे गावात पोलीस छावणीचं स्वरुप आले आहे. तर मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकला जात आहे. यानंतर प्रशासनाच्या या कठोर भूमिकेवर ग्रामस्थांनी बैठक घेतली असून परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com