Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

Eknath Shinde : राज्यातील महिलांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस आले पाहिजेत, या उद्देशाने लाडकी बहीण योजना आखली आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. यासाठी ३३ हजार कोटी रुपये बाजूला काढले आहेत.

Team Agrowon

Akola News : राज्यातील महिलांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस आले पाहिजेत, या उद्देशाने लाडकी बहीण योजना आखली आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. यासाठी ३३ हजार कोटी रुपये बाजूला काढले आहेत. तुम्ही ताकद दिली, तर आम्ही केवळ १५०० वर थांबणार नाही. दीड हजारांचे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील, हात आखडता घेणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महामेळावा बुलडाणा येथे झाला. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘स्त्रीशक्तीच्या वाट्याला कुणी जाऊ नका. योजनेत खोडा घालू नका. अशांना कशी जागा दाखवायची हे तुम्ही बहिणींनी ठरवावे. आज राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. पायाभूत सुविधा तयार करीत आहोत. लाडक्या भावांसाठीही योजना बनवली आहे. १० हजारांपर्यंत त्यांना भत्ता मिळते आहे.

देशातील असे पहिले राज्य बनले आहे. काही जण ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. कालच या योजनेला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या एका नेत्याने ही योजना बंद करू, असे वक्तव्य केले. काही जण म्हणतात, दीड हजारांत तुम्ही महिलांना विकत घेणार का. पण हे सरकार महिलांच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे.

आरक्षणाच्या विषयावर त्यांनी काँग्रेसवर टीका केली. नेहरूंपासून सर्वांनी यापूर्वी आरक्षण रद्द करण्याची भाषा वापरल्याचा उल्लेख केला. फडणवीस यांनीही विरोधी पक्षांवर टीका करीत, लाडकी बहीण योजना बंद करण्याचा ते अपप्रचार करीत आहेत, असे सांगितले. योजना बंद करण्यासाठी न्यायालयात जात आहेत. पण सरकार हे जनतेसाठी काम करीत आहे.

भाजप सरकार आल्यानंतर जिगाव प्रकल्पाला सहा हजार कोटी रुपये आतापर्यंत दिले आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचे काम करीत आहोत. वैनगंगा-नळगंगा प्रकल्प करीत आहोत. साडेपाचशे किलोमीटर नदी तयार करून ते पाणी बुलडाणा जिल्ह्यात आणणार आहोत. या जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम करणार आहोत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की महिलेला सबल, सक्षम करायचे आहे. तिला मान, सन्मान, प्रतिष्ठा दिलेली आहेच. महायुतीचे हे सरकार महिलांसाठी, गोरगरिबांसाठी काम करीत आहे. पण विरोधकांना हे बघवत नाही. तुम्ही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.

लोकसभा निवडणूक प्रचारात त्यांनी खोटे बोलून मते मागितली. संविधान बदलणार, आरक्षण काढणार सांगितले. तुमच्यापैकी काहींनी विश्‍वास ठेवला. पण ते खोटे बोलले. दुधाला आपण पाच रुपये अनुदान देत आहोत. बुलडाणा जिल्हा बँकेला ३०० कोटींची महाराष्ट्र राज्य बँकेकडे शासनाने गॅरंटी दिली आहे. त्यामुळे आज ही बँक सुरू झाली आहे.

अजित पवारांनी ‘वाचाळवीरांना’ सुनावले

सत्तेतील, विरोधातील वाचाळवीरांचे अजित पवार यांनी थेट व्यासपीठावरून जाहीरपणे कान पिळले. ते म्हणाले, वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात. राग व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यशवंतराव चव्हाणांनी राज्यात सुसंस्कृतपणा घालून दिला. आपल्याला अनेक प्रकारच्या भाषा बोलता येतात. त्याचा विचार करा. जर कुणी हे विसरले तर त्याच्या वक्तव्याला महायुतीच्या सरकारचे समर्थन नाही, हेही लक्षात ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT