VNMKV Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आठ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित

National Agricultural Higher Education Project : राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे ८ शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे ८ शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख संशोधक प्रा. गोपाल शिंदे यांच्या प्रयत्नातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ७८ संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १ ते ३ महिने संशोधन प्रशिक्षण व संशोधन प्रात्यक्षिकाकरिता संशोधन प्रबंध लिहून रशिया व बेलारूस देशातील शासकीय आंतरराष्ट्रीय परिषदेत एकूण १५ शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातून ८ उत्कृष्ट शोधनिबंध नेचर व स्प्रिंजरद्वारा संयुक्तरीत्या प्रकाशित केले आहेत.

शोधनिबंधाच्या लेखनामध्ये विद्यापीठाच्या २५ संशोधकांचा सहभाग असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या शोधनिबंधाचे त्याचे कॉपीराइट हक्क या संशोधकांना प्राप्त झाले आहेत.

शोधप्रबंध लेखकामध्ये कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. यू. एम. खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. व्ही. आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल सय्यद इब्राहिम, डॉ. आर. बी. क्षीरसागर, शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे, बी. एस. अगरकर, पी. यू. घाटगे, दिगंबर पेरके, धीरज पाथरकर, श्रद्धा मुळे, डी. डी. टेकाळे, सुनीता पवार, पी. एच. गौरखेडे, बुद्धभूषण वानखेडे, आर. एस. साळवे, सुशांत भालेराव, ओंकार काकडे, डी. व्ही. समिंद्रे, स्नेहा भिसे, अपेक्षा ठोंबरे, संग्राम वंधेकर, अबोली भातलवंडे, प्रत्यूष राख यांचा समावेश आहे.

या विशेष कामगिरीमुळे विद्यापीठातील संशोधनास चालना मिळाली असून, शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजक संस्थामध्ये बेलारूस राष्ट्रीय अकादमी ऑफ सायन्सेसच्या कृषी मशिनीकरणावरील शास्त्रीय आणि प्रायोगिक केंद्र आणि सेंट पीटर्सबर्ग फेडरल रिसर्च सेंटर ऑफ रशियन अकादमी ऑफ सायन्सेस यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

या परिषदेत प्रा. गोपाळ शिंदे यांनी ‘डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी संशोधनातील नेमकेपणा’ या विषयावर भाषण व सादरीकरण दिले. बेलारूसचे प्रा. डॉ. मिखाइल टाटूर, रशियाचे प्रा. डॉ. आंद्रेई, प्रा. डॉ. पावेल नवित्स्की, प्रा. डॉ. फ्रान्सिस्को रोविरा-मास यांनी या प्रकल्पात पुढाकार घेऊन त्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT