Ahilyanagar News: राज्यात लहान, मध्यम व मोठे असे एकूण सुमारे २९९७ इतकी धरणे आहेत. यंदा ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत राज्यातील सर्व धरणांमध्ये ७२.७० टक्के (१०४०.०७६ टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत सर्व धरणांत सुमारे ६५.०७ टक्के म्हणजेच ९३०.९२० टीएमसी साठा होता. या वर्षी सुमारे ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा अधिक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.
राज्यातील बहुतांश भागात यंदा मे महिन्यात जोरदार पाऊस झाला. इतर ठिकाणी खंड पडला तरी घाटमाथ्यावर जून व जुलै महिन्यांतही बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे राज्यभरातील धरणांत बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे.
कोकण विभागात एकूण १७३ धरणे असून त्यामध्ये १११.२७० टीएमसी (८५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागात ५३७ इतकी लहान, मध्यम व मोठी धरणे असून त्यात १४२.४९१ टीएमसी (६७.९७ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर, पुणे विभागात एकूण ७२० धरणे असून त्यामध्ये ४४४.९७२ टीएमसी (८२.८५ टक्के) उपयुक्त साठा झाला आहे.
मराठवाडा विभागामध्ये ९२० धरणे असून त्यामध्ये १५२.९९६ टीएमसी (५९.६७ टक्के) उपयुक्त साठा आहे. अमरावती विभागामध्ये २६४ धरणे असून त्यामध्ये ८४.३७ टीएमसी (६१.१८ टक्के) नागपूर विभागात ३८३ धरणे असून या धरणांमध्ये १०४.७०४ टीएमसी (६३.८५ टक्के) उपयुक्त साठा झाला आहे.
राज्यातील एकूण साठ्याचा विचार केला तर सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात (८५ टक्के), त्या खालोखाल पुणे विभागात (८२.८५ टक्के) साठा झालेला असून, सर्वांत कमी साठा मराठवाडा विभागात (५९.६७ टक्के) आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठा
- उजनी धरण : ११६.४०० टीएमसी ( ९९.२८ टक्के)
- कोयना धरण : ८७.४५० टीएमसी (८३.०८ टक्के)
- जायकवाडी धरण : ९६.३९० टीएमसी (९३.८३ टक्के)
राज्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेला कमी-जास्त पाऊस, मेमध्ये झालेला पाऊस यामुळे धरणात गत वर्षीपेक्षा यंदा ८ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरडवाहू भागात मात्र सध्या पावसाची नितांत गरज आहे.हरिश्चंद्र चकोर, सेवानिवृत्त, जलसंपदा विभाग, संगमनेर, जि. अहिल्यानगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.