
Parbhani News : जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ११.१६४ दलघमीनुसार २६ टक्के तर दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
परंतु ३ लघु तलावात १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु कमी पावसाच्या भागातील ८ लघु तलावातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. परभणी जिल्ह्यात १७ ते २७ जुलै या कालावधीत अनेक प्रकल्पांच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाला.त्यानंतर मात्र उघडीप दिली आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. ३१) घेतलेल्या नोंदीनुसार लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात गुरुवार (ता. २७) च्या ७.५६५ दलघमी (१७.९२ टक्के) च्या पाणीसाठ्याच्या तुलनेत ८.५३ टक्केनी वाढ होऊन ११.१६४ दलमघीनुसार २६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १४.४८१ दलघमी (२७.८२ टक्के) च्या तुलनेत २३.१८ टक्क्यांनी वाढ होऊन गुरुवारी (ता. ३१) सरासरी २६.८०२ दलघमीनुसार ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.
मध्यम प्रकल्पात सरासरी ५१ टक्के पाणीसाठा...
करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये सोमवारी (ता. २८) २०.८९४ दलघमीनुसार ८४ टक्के पाणीसाठा होता. त्यात वाढ होऊन गुरुवारी (ता. ३१) २२.००८ दलघमीनुसार ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.
मागील आठवड्यात मासोळी मध्यम प्रकल्पांत ४.६२१ दलघमीनुसार पाणीसाठा होता.त्यात वाढ होऊन ४.७९३ दलघमीनुसार १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. ३१ जुलै २०२४ रोजी मध्यम प्रकल्पात सरासरी २१.२५२ दलघमीनुसार ४०.८४ टक्के पाणीसाठा होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.